श्री.द. महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. श्री.द. महाजन हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. हे वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्राचे तज्‍ज्ञ आणि देवरायांचे अभ्यासक आहेत. हे जंगल-वनांमध्ये भटकून संशोधन करतात.

महाजन यांनी कोल्हापूर येथे निसर्ग मित्र मंडळ स्थापन केले होते आणि या मंडळातर्फे देवराई वाचवा ही चळवळ त्यांनी उभी केली. पुण्यातही त्यांनी निसर्गाची ओळख करून देण्याचे आणि निसर्गसंवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले असून निसर्ग सेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या परिचय वर्गातही महाजन यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अनेक संस्था आणि महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक म्हणूनही ते काम करतात. हे महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे अध्यक्ष आणि पुण्यातील एम्प्रेस गार्डनचे विश्वस्त आहेत.

पुस्तके[संपादन]

  • आपले वृक्ष
  • देशी वृक्ष (प्रकाशन, पुणे २७ सप्टेंबर २००९)
  • निसर्गभान
  • विदेशी वृक्ष

सन्मान[संपादन]

  • पुणे महापालिकेतर्फे खास सत्कार (५ जून २०१३)