श्रीधर तिळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीधर गोविंदराव तिळवे नाईक हे मराठी लेखक व कवी आहेत. ते साहित्य हा विषय घेऊन कोल्हापूर विद्यापीठातून एम.ए. झाले आहेत. त्या परीक्षेत ते पहिल्या वर्गात पहिले आले होते. त्यानंतर त्यांना विद्यापीठ अनुदान मंडळाकडून दृष्यकलांच्या अभ्यासासाठी, आधी दोन वर्षांची ज्युनियर फेलोशिप व नंतर तीन वर्षांची सीनियर फेलोशिप मिळाली. ती घेऊन त्यांनी पीएच.डी मिळवली.

श्रीधर तिळवे हे बुद्धिबळाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवतात.

तिळवे यांनी एका आंतरराष्ट्रीय लेखक संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्सने भरवलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात तिळवे यांनी 'समकालीन तत्वज्ञान आणि समाजजीवन' या विषयावर एक अभ्यासलेख सादर केला होता.

साहित्य[संपादन]

  • अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हाची गोष्ट (कथा संग्रह)
  • एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार (कविता संग्रह)
  • उपाय (कादंबरी ?)
  • क. व्ही. श्रीधर तिळवे (कविता संग्रह)
  • चॅनेल डी-स्ट्रॉयरी अर्थात जागतिकीकरणात नष्ट होत चाललेल्या गोष्टी (कविता संग्रह)
  • डेकॅथलॉन रिअल (कविता संग्रह)
  • मन्वंतर एक दृष्यकथा : जोशी की कांबळे (नाटक)