Jump to content

शेळ्यांचे रोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायकोप्लाझ्मा, मायकोप्लाझ्मा मायकॉइड व्हार कॅप्री या सूक्ष्मजंतूंमुळे सांसर्गिक परिफुप्फुसशोथ (फुप्फुसावरील आवरणाला सूज), फुप्फुसशोथ (फुप्फुसाची सूज) तर मायकोप्लाझ्मा ॲगॅलॅक्शिया यांमुळे सांसर्गिक दुग्धन्यूनता हे रोग होतात.

ब्रूसेला मेलिटेन्सिस या सूक्ष्मजंतूमुळे ब्रूसिलोसिस हा संसर्गजन्य रोग होतो.

शेळ्यांना स्तनावर देवी रोग होतो. व्हिब्रिओसिस हा व्हिब्रिओफीटस या सर्पिल आकाराच्या जंतूं मुळे गुप्तरोग होतो. लेप्टोस्पायरा पोमोना या सूक्ष्मजंतूमुळे लेप्टोस्पायरोसिस हा सांसर्गिक रोग होतो.

तसेच पर्णाभकृमी (पट्टकृमीचा प्रकार), गोलकृमी व फीतकृमी  (चपटे जंत) यांच्या अनेक जातींमुळे शेळ्यांमध्ये रोग निर्माण होतात.

पिट्टू किंवा गिलार, हगवण, कंबरेखालच्या भागाचा पक्षाघात, अशक्तपणा यांशिवाय पोटफुगी, ॲसिटोनीमिया, गर्भिणी  विषबाधा, अस्थिभंग  वगैरे   रोग  शेळ्यांना  होतात.

संदर्भ[संपादन]