Jump to content

शेंडे दाबकलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेंडे-दाबकलम (Tip Layering). या पद्धतीत मातृवृक्षाच्या फांदीचा शेंडा जमिनीत वा माध्यमात दाबून त्याला मुळया फुटू देतात. त्याकरता फांदीचे टोक वाकवून त्याचा शेंडा माध्यमात गाडतात. या पद्धतीत फांदीच्या जमिनीतल्या टोकाला मुळया फुटतात. आपल्याकडे कोणत्याही फळझाडाची अभिवृद्धी या दाबकलम पद्धतीने करत नाहीत. परंतु युरोप आणि अमिरिकेत ब्लॅकबेरी, गुजबेरीत, रासबेरीत या पद्धतीचा अभिवृद्धीकरता वापर करतात.