शेंडी बदक
Appearance
शेंडी बदक किंवा काळा बरडा, गिजऱ्या, गोचा गिजरा, कारंज्या किंवा बाड्डा (इंग्रजी: Tufted duck, टफ्टेड डक) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो. हा काळा-पांढरा असतो. बाजूने पाहिल्यावर त्याच्या डोक्यावरची शेंडी स्पष्ट दिसते. नराच्या पंखाकाठी पांढरी पट्टी असते. या पक्षाची मादी गडद उदी रंगाची असते. मादीला शेंडी नसते आणि तिचा खालचा भाग फिक्कट असतो.
हे पक्षी पाकिस्तान, नेपाळ आणि उत्तर भारतात हिवाळी पाहुणे असतात. तसेच बांगला देश ते मणिपूर येथेही ते सापडतात. दक्षिण भागात त्याचे प्रमाण कमी असते. तसेच मालदीव बेटे आणि श्रीलंकामध्येही हे क्वचित आढळतात.
संदर्भ
[संपादन]पक्षिकोश - मारुती चितमपल्ली