शॅरॉन कॉर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शॅरॉन कॉर

शॅरॉन कॉर
आयुष्य
जन्म २४ मार्च १९७०
जन्म स्थान डंडाल्क
संगीत कारकीर्द
पेशा संगीतकार, गायिका, व्हायोलीन वादक
गौरव
गौरव एम. बी. ई.

शॅरॉन हेल्गा कॉर (मेंबर ऑफ ब्रिटीश एम्पायर) (जन्म २४ मार्च १९७०) ह्या एक  आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आहेत. [१]त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बॅंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, अँड्रिया आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर ह्या बॅंडची स्थापना केली. त्या चौघांचा हा बॅंड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. शॅरॉन ह्या व्हायोलीन, पियानो आणि गिटार वाजतात आणि गातात. त्या आणि त्यांची भावंडे डंंडाल्क, काऊंंटी लुथ,आयर्लंडचे आहेत.[२]

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी व्हायोलीन शिकायला सुरुवात केली. त्या आयर्लंडमधील ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली आणि त्या आता व्हायोलीन शिकवण्यासाठी पात्र आहेत.[३]

कारकीर्द[संपादन]

त्यांनी १९९० सालापासून २००६ सालापासून द कॉर्सबरोबर काम केले. त्यानंतर २०१५ साली व्हाईट लाईट ह्या अल्बमसाठी द कॉर्स हे एकत्र आले होते. द कॉर्स ह्यांना त्यांच्या तिसऱ्या अल्बमनंतर प्रसिद्धी मिळाली. २००९ साली, शॅरॉन कॉर ह्यांनी त्यांचे पहिले स्वतंत्र एकल गाणे, 'इट्स नॉट अ ड्रीम' प्रसिद्ध केले. त्यांचा ड्रीम ऑफ यू हा अल्बम १३ सप्टेंबर २०१० ह्या दिवशी प्रसिद्ध झाला. त्यांनी ह्या अल्बममध्ये स्वतः लिहिलेले संगीत आणि काही इतरांनी लिहिलेली गाणी व्हायोलीनवर वाजवली आहेत. ह्या अल्बमसाठी त्यांना द कॉर्सला साथ करणारे अँथनी ड्रेनन, कीथ डफी आणि जेसन डफी ह्यांनी साथ केली.

पुरस्कार[संपादन]

शॅरॉन यांना त्यांच्या संगीत आणि धर्मादाय क्षेत्रातील कामासाठी त्यांच्या भावंडांसमवेत राणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्याकडून एम. बी. ई. हा सन्मान मिळाला.

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

शॅरॉन कॉर यांचा रोबर्ट गव्हीन बोनार ह्यांच्याशी विवाह झाला होता. कॅथेल रॉबर्ट जेरार्ड हा त्यांचा मुलगा आहे आणि फ्लोरी जीन एलिझाबेथ ही त्यांची मुलगी आहे.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Sharon Corr". sharoncorr.com. 2021-05-04 रोजी पाहिले.
  2. ^ "The Corrs - Music Charts". acharts.co. 2021-05-04 रोजी पाहिले.
  3. ^ "The Biography Channel - The Corrs Biography". web.archive.org. 2007-05-29. Archived from the original on 2007-05-29. 2021-05-04 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ "belfasttelegraph" (इंग्रजी भाषेत). ISSN 0307-1235.