शुभ्रकंठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शुभ्रकंठी
Indian Silverbill (Lonchura malabarica) near Hyderabad W IMG 7786.jpg
शास्त्रीय नाव यूओडाइस मालाबारिका
(Euodice malabarica)
कुळ चटकाद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश व्हाईट थ्रोटेड मुनिया
(White-throated Munia)
संस्कृत श्वेतकण्ठ पुत्री
हिंदी चडक्का, पिदार

शुभ्रकंठी, किंवा फिकी मुनिया (शास्त्रीय नाव: Euodice malabarica, यूओडाइस मालाबारिका ; इंग्लिश: White-throated Munia, व्हाईट थ्रोटेड मुनिया) ही भारतीय उपखंडात आढळणारी, चटकाद्य पक्षिकुळातील प्रजाती आहे. खुरटी झुडपे किंवा गवताळ प्रदेशांत यांचा आढळ दिसतो. शुभ्रकंठ्यांमधील नर आकारमानाने साधारणतः १०-१२ सें.मी.पर्यंत वाढतात. यांना चंदेरी रंगाची, शंक्वाकार चोच असते. यांच्या पाठीकडील भाग मातकट ब्राउन रंगाचा असतो, तर पोटाकडील भाग पांढुरके असतात. पंखांचा रंग बहुशः मातकट-ब्राउन असला, तरीही त्यांच्या कडा शेपटीप्रमाणे गडद काळपट रंगाच्या असतात.

अधिक वाचन[संपादन]

  • पांडे,सतीश. बर्ड्स ऑफ वेस्टर्न्स घाट्स, कोंकण अँड मलबार (इंग्लिश मजकूर). 

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.