Jump to content

शुक्लेश्वर मंदिर (भिंगार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे. भृगु ऋषींचे शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती. स्वयंभू श्री. शुक्लेश्वर महादेव मंदिर अनेक पुराणात व इतिहासात प्रसिद्ध आहे.

मंदिरातील महादेवाची शाळुका ही स्वयंभू असुन तिच्या सर्व बाजूंनी सतत गंगा (पाणी) झुळझुळ वाहत असते.

पुराण व शास्त्रानुसार सुर्यपुराण व काशिखंड ग्रंथामध्ये भिंगारच्या शुकलेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. सूर्य पुराणात नवनाथ निर्मिति पूर्वीचे हे स्थान आहे. रामायण काळात दंडक अरण्यातील भृगृऋषीचे निवास असलेल्या आजच्या भिंगारला भृगुपुर असे नाव होतें.

निजामशाही राजधानी असलेल्या अहमदनगर शहर स्थापनेला 514 वर्षे झाली आहेत. त्या आधी सुमारे 1000 वर्षे पूर्वीचे हे शुक्लेश्वर मंदिर आहे. असा अनुमान इतिहास संशोधक (सरदार) नानासाहेब मिरीकर यांचा आहे. या मंदिराची दुसरी आख्यायिका ऐतिहासिक असुन ती इ. स 4 थ्या ते 11 व्या शतकातील आहे. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशावरून सदाशिव भाऊ पेशवे पानिपत स्वारीवर निघण्याच्या तयारीत होतें. त्यावेळेस त्यांनीं शुक्लेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व दिवाबत्तीची सोय लावून येथे महारुद्र अभिषेक केला. त्यावेळी सन 1757 मधे नगरचा किल्ला हैद्राबादच्या निजामाचा किल्लेदार कविजंग बहादुर याने तहात सदाशिव भाऊ पेशवे यांच्या स्वाधीन केले. त्यावेळी सदाशिव भाऊंनी शुक्केश्वर मंदिरात जाऊन महादेवापुढे बेलभंडार उचलून कविजंगला अभय दिलें असा उल्लेख सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या "पानिपत" कादंबरीत भिंगारचा उल्लेख शुक्लेश्वर म्हणून आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात असलेलें हे मंदिर भिंगारच्या प्राचीन इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेले पवित्र स्थळ आहे.