शिवा (कार्टून कार्यक्रम)
Appearance
शिवा | |
---|---|
शैली | ॲक्शन ॲडव्हेंचर |
मूळ देश | भारत |
Production | |
एकुण वेळ | २० मिनिटे |
Production company(s) |
वायाकाॅम १८ |
Broadcast | |
Original channel | निक |
शिवा हा एक निक चॅनलचा कार्टून कार्यक्रम आहे. वायाकाॅम १८ ही कंपनी या कार्यक्रमाची निर्माता आहे.[१] या कार्यक्रमामध्ये शिवा नावाचा मुलगा वेदा गावात राहतो व गावाला तेथील लोकांना संकटांपासून वाचवतो.
कथा
[संपादन]शिवा वेदा गावात त्याच्या आजोळी आजी आजोबांबरोबर राहतो. शिवा हा खूप धाळशी मुलगा आहे. त्याच्याजवळ त्याची आधुनिक सायकल आहे जी हवेमध्येपण उळू शकते.शिवा आणि त्याचे मित्र रेवा , युडी (उदय) आणि आदी (आदित्य) हे मिळून गुंडांशी लढतात. गावातील इनसपेकटर लड्डू सिंगीला गुंडांना पकळण्यास मदत करतात.
पात्र
[संपादन]- शिवा - शिवा नऊवर्षांचा मुलगा आहे तो वेदा गावात त्याच्या आजोळी आजी आजोबंसोबत राहतो.तो खूप धाळशी आहे तो फाईटिंग करण्यामध्ये पारांगत आहे.जे गुंड , डाकू आणि आतंकवादी वेदा गावात तोडफोड करतात कट कारस्थान करतात त्यांना शिवा आणि त्याचे मित्र रेवा, यूडी (उदय) हे गुंडांना मार देतात व पोलीस लड्डू सिंग त्यांना पकडून तुरुंगात टाकतो.
- रेवा - रेवा शिवाची मित्र आहे ती खूप धाळसी आहे ती संकटांना घाबरत नाही ती सायकल चालवते रेवा तिचे मित्र शिवा , आदी हे चोरांना , गुंडांना पकळून मारतात व वेदा गावच रक्षन करतात.
- आदी - हा शिवाचा मित्र आहे.तो घाबरतो पण तो धाळशिसुद्धा आहे.
- उदय - सर्व त्याला युडी या नावाने संबोधतात.तो शिवाचा मित्र आहे.
- इन्स्पेक्टर लड्डू सिंग - हा वेदा गावातल्या पुलिस स्टेशनातला इन्स्पेक्टर आहे तो खूप भित्रा आहे. अनेक वेळेला गुंड त्याला खूप मारतात. गुंडांना पकडायला तो शिवा व त्याच्या मित्रांची मदत घेतो. लड्डू सिंग हा विनोदी पात्र आहे.
- पेळाराम - पेळाराम हा वेदा गावातील पुलिस स्टेशनात्ला हवालदार आहे.तो मूर्ख आहे.
- नाना - नाना शिवा आजोबा आहेत त्यांना वाटतं ते भारतीय क्लासिकल गायन खूप उत्कृष्टपणे करतात परंतु ते गातात तेव्हा कर्कश आवाजाने सगळ्यांचे कान दुखू लागतात.ते लठ्ठ आहेत.
- नाणी - नाणी शिवाची आजी आहे ती म्हातारी आहे. जेव्हा जेव्हा लड्डू सिंग शिवाची मदत मागतो तेव्हा केव्हा केव्हा आजी त्याला पळऊन लावते.
- भीम सिंग - हा शिव घरातला नोकर आहे तो खूप पतला आहे तो लड्डू सिंगला घरातून हकालण्यास नानीची मदत करतो. नाना जेव्हा गाणं गातात तेव्हा भीम सिंग त्यांना गाणं बंदकरण्यासाठी प्रयत्न करतो.
- स्वामी - हा शिवाचा शेजारी आहे तो त्याच्या पत्नी बरोबर राहतो.नाना जेव्हा गाणं म्हणतात तेव्हा त्याला त्रास होतो.
- स्वामींची पत्नी - स्वामींची पत्नी स्वामी बरोबर राहते तिला शॉपिंग खूप आवळते.
संदर्भ
[संपादन]- ^ टीम, इंडियन टेलिव्हिजन. कॉम (२१ एप्रिल २०१६). "निकलोडियनने 'शिवा' बरोबर सोनिकला अधिक दमदार केले". इंडियन टेलिव्हिजन. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-08-08. १८ जून २०२० रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)