शिजो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्राट शिजो (मार्च १७, इ.स. १२३१ - फेब्रुवारी १०, इ.स. १२४२) हा जपानचा ८७वा राज्यकर्ता होता. याचा राज्यकाल ऑक्टोबर २६, इ.स. १२३२ ते मृत्युपर्यंत होता.

शिजोचे मूळ नाव मित्सुहितो असे होते व तो सम्राट गो-होरिकावाचा मुलगा होता. दोन वर्षांचा असताना शिजोला सम्राट केले गेले. त्याचे दोन मामा कुजो मिचीसैओन्जि किन्त्सुनेने त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला.

वयाच्या १०व्या वर्षी एका अपघातात शिजोला मृत्यु आला.

मागील:
गो-होरिकावा
जपानी सम्राट
ऑक्टोबर २६, इ.स. १२३२फेब्रुवारी १०, इ.स. १२४२
पुढील:
गो-सागा