शासन आपल्या दारी योजना
महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या फायद्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते परंतु बऱ्याच नागरिकांना या योजनांची माहिती नसते तर बऱ्याचदा नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात व अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाच वाया जातो व योजनांचा लाभ देखील मिळत नाही त्यामुळे शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमिअभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.यामध्ये शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला), मतदारनोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंबकल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाहनोंदणी,कुपोषित बालकांची तपासणी, जमीनमोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनावरांची तपासणी शिबिर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे
उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांसाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- नागरिकांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी.
- सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वैशिष्ट्य
- महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- जिल्ह्यात सुमारे ५ हजार ४५७ कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
- योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
- एकाच पोर्टलवर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
- या योजनेद्वारे शासन थेट नागरिकांच्या दारी येत आहे.
- या योजनेअंतर्गत महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा समावेश असणार आहे.
शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि कार्यक्रम
[संपादन]- आरोग्य शिबिर
- रोजगार मेळावे
- रक्तदान शिबिर
- पासपोर्ट
- कृषी सेवा केंद्राचे परवाने
- सेवानिवृत्त लाभ
- आधार कार्ड सुविधा
- पॅन कार्ड सुविधा
- पीएम किसान योजना
- विवाह नोंदणी
- ई-श्रम कार्ड
- भरती मेळावा
- पीएफ घरकुल योजना
- मनरेगा
- जॉब कार्ड
- डिजिटल इंडिया
- सखी किट वाटप
- शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
- मुलींना सायकल वाटप
- नवीन मतदार नोंदणी
- दिव्यांग साहित्य वाटप
- शिकाऊ चालक परवाना
- कृषी प्रदर्शन
संदर्भ
- ^ "शासन आपल्या दारी योजना : Shasan Aplya Dari Yojana Registration - Sarkari Yojna Info" (इंग्रजी भाषेत). 2024-04-28. 2024-06-02 रोजी पाहिले.
- ^ "योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी !". माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. 2024-06-02 रोजी पाहिले.