शाश्वत विकास ध्येये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाश्वत विकास ध्येये (इंग्रजी: Sustainable Development Goals; लघुरूप:एस.डी.जी.) हा भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय विकास संबंधित ध्येयांचा संच आहे. ही ध्येये युनायटेड नेशन्स ने बनविली असून त्यांची शाश्वत विकासासाठिची जागतिक ध्येये अशी बढती करण्यात आलेली आहे. या ध्येयांनी, सहस्र (मिलेनियम) विकास ध्येये ज्यांची मुदत वर्ष २०१५ च्या शेवटी संपली, त्यांची जागा घेतली आहे. वर्ष २०१५ पासुन २०३० पर्यंत ही ध्येये लागू पडतील. एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी १६९ विशिष्ट ध्येयेआहेत.[१]

ध्येये[संपादन]

2015च्या ऑगस्ट मध्ये 193 देशांनी खालील 17 ध्येयांना मान्यता दिली आहे[२]:

  1. दारिद्रय निर्मुलन - सर्वत्र, सर्व स्वरूपतील दारिद्र्य / गरीबी नष्ट करणे.
  2. भूक निर्मुलन - भूक नष्ट करणे, अन्नाची सुरक्षितता व सुधारीत पौष्टिकता साध्य करणे आणि शाश्वत शेतीची जाहिरात करणे.
  3. चांगले आरोग्य - निरोगी आयुष्याची खात्री करून घेणे आणि सर्व वयोगटांमधील लोकांना स्वास्थ्य राखण्यास मदत करणे.
  4. दर्जेदार शिक्षण - सर्वांसाठी सर्व-समावेशित व योग्य शिक्षणाची खात्री करून घेणे आणि सर्वांना आयुष्यभर शिक्षणाच्या सुसंधी मिळवून देण्यासाठी मदत करणे.
  5. लैंगिक समानता - लैंगिक समानता साध्य करणे आणि सर्व महिला व मुलींना अधिकार देणे.
  6. शुद्ध पाणी आणि आरोग्य्दायक स्वच्छता - सर्वांसाठी पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे आणि त्याची व्यवस्था बघणे.
  7. नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा - सर्वांना स्वस्त, विश्वसनीय, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे.
  8. चांगल्या नोकऱ्या आणि अर्थशास्त्र - सर्वांसाठी, कायम चालू ठेवलेली (सस्टेन्ड), सर्वसमावेशक व शाश्वत आर्थिक वाढ , पूर्ण आणि फलदायक कामधंदा / नोकरी आणि योग्य काम मिळवून देण्यास मदत करणे.
  9. नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा - विविध शब्दरचना आवश्यक: लवचिक पायाभूत सुविधा उभारणे, सर्वसमावेशक व शाश्वत उद्योगीकरण आणि भरभराटीस सहाय्य करणाऱ्या नवीन उपक्रमांना मदत करणे.
  10. असमानता कमी करणे - सर्व देशांमधील व देशांची आपापसातील असमानता कमी करणे.
  11. शाश्वत शहरे व वसाहती - शहरे व मानवी समाजांना सर्वसमावेशक, सुरक्षित, संवेदनक्षम आणि शाश्वत बनविणे.
  12. उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर - साधनांचा शाश्वत उपभोग आणि उत्पादन नमुना याची खात्री करून घेणे.
  13. हवामानाचा परिणाम - हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम निराकारण करण्यासाठी त्वरीत उपाययोजना करणे.
  14. शाश्वत महासागर - शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र, आणि सागरी साधने जतन करणे व त्यांचा सातत्याने वापर करणे.
  15. जमिनीचा शाश्वत उपयोग - विविध शब्दरचना आवश्यक: जमिनीवरील पर्यावरण संस्थेचे रक्षण करणे, त्याची पुनःस्थापना करणे, त्याचा शाश्वत वापर करण्यास मदत करणे, सातत्याने जंगलांची व्यवस्था बघणे, जंगले ओसाड होण्यापासून थांबवणे, जमिनीची धूप थांबवणे व धूप झालेल्या जमिनीची पुनःस्थापना करणे आणि जैवविविधतेची हानी होण्यापासून थांबवणे.
  16. शांतता आणि न्याय - शाश्वत विकासासाठी शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजांना प्रोत्साहन देणे, सर्वांना न्याय मिळवून देणे, सर्व पातळींवर कार्यक्षम, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था स्थापन करणे
  17. शाश्वत विकासासाठी भागिदारी - शाश्वत विकासाची पूर्तता करण्याच्या पद्धती सामर्थ्यवान करणे आणि जागतिक भागिदारीमध्ये नवचैतन्य निर्माण करणे.


संदर्भ[संपादन]