शारदा चिटफंड कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शारदा चिटफंड कंपनी ही कोलकातामधील एक चिटफंड कंपनी आहे. सुदीप्‍तो सेन हे या कंपनीचे संस्थापक आहेत. शारदा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये सुमारे २०० कंपन्या आहेत, त्यांपैकी ही एक आहे. या चिटफंड कंपनीचा विस्तार पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात आहेत. कंपनीचे १७ लाख गुंतवणूकदार असून गुंतवलेली एकूण रक्कम २४६० कोटी आहे.

गुंतवणूकदारांचे रुपये हडप करून ही कंपनी २००३ च्या एप्रिलमध्ये बंद पडली. हिचे प्रमुख सुदीप्‍तो सेन आणि दुसऱ्या भागीदार देवजनी मुखर्जी अटकेत आहेत. कंपनीचे अन्य अधिकारी :- तृणमूल काँग्रेसचे खासदार अहमद हसन आणि अर्पिता घोष, तृणमूलचे उपाध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक रजत मुजुमदार, आसाम राज्याचे पोलीस महासंचालक शंकर बरुवा, आसामी गायक आणि चित्रपट निर्माते सदानंद गोगोल, ओरिसा राज्याचे माजी महाधिवक्ता अशोक मोहंती आणि कुणाल घोषसह तृणमूलशी संबंधित असलेले अनेक राजकीय नेते.[ संदर्भ हवा ]