शाका झुलू
Appearance
शाका झुलू (१७८७ - १८२८) हा दक्षिण आफ्रिका परिसरातील झुलू लोकांचा पुढारी व १८१६ ते १८२८ दरम्यान झुलू राजतंत्राचा राजा होता. त्याला आजवरचा सर्वात प्रभावशाली झुलू राजा मानले जाते. शाकाच्या नेतृत्वाखालील झुलू राजतंत्राने मोठ्या भूभागावर सत्ता चालवली. हा भूभाग सध्या दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल प्रांताचा भाग आहे.
शाकाला झुलू समाजामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय दिले जाते. तसेच त्याने अनेक नव्या युद्धपद्धतींचा अंगिकार केला ज्यामुळे झुलू लष्कर सामर्थ्यवान बनले. आजही दक्षिण आफ्रिकेमधील संस्कृतीवर शाकाचा पगडा जाणवतो. डर्बनच्या किंग शाका आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.