शांताबाई दाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शांताबाई दाणी (१ जानेवारी, १९१८ - ??) या आंबेडकरवादी लेखिका होत्या.

जीवन[संपादन]

शांताबाई दाणी यांचा जन्म १ जानेवारी इ.स. १९१८ साली नाशिक येथे सर्वसामान्य घरात झाला. आई कुंदाबाई दाणी अशिक्षित होत्या. परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. शांताबाईना शिक्षणाची गोडी लागली. त्यांनी बी. ए. झाल्यावर ट्रेनिंग होऊन काही वर्षे नोकरी केली. शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. दादासाहेब गायकवाड व इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने किंबहूना त्यांअधिक वेगाने कार्य करीत शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास अगदी लीलया पार केला. १९४६ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आयोजित केलेले महिला संमेलनाचे अध्यक्षपद असो किंवा रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९५७ साली झालेली स्थापना असो किंवा दादासाहेबांनी उभारलेला भूमिहिनांचा लढा यशस्वी करणे असो शांताबाईंनी प्रत्येक आघाडी नेटाने लढविली, परंतु शांताबाईंनंतर चळवळीत सर्वस्व झोकून देणारे महिला नेतृत्व मिळाले नाही.१९४६ साली पुणे कराराच्या निषेधार्त दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते.त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत त्या सहभागी होत्या.