शहामृग
Jump to navigation
Jump to search
जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळते. शहामृगांना उडता येत नसले, तरी ते कमालीच्या वेगाने धावू शकतात. हा पक्षी ताशी ६५ किमीपर्यंतच्या वेगाने धावू शकतो. धावताना दिशा बदलण्यासाठी ते पंखांचा उपयोग करू शकतात. शहामृगाचे पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात १० ते १६ फूट अंतर ते कापू शकतात. या पायांच्या प्रहाराने तो सिंहासारख्या हल्लेखोरालाही तो ठार करू शकतो. शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असते. हा पक्षी लहान कळपात राहतो.