शरीफजीराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to searchCommons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


शरीफजीराजे व शहाजीराजे हे दोघेही मालोजी राजे यांचे पुत्र होते .मालोजी राजे यांनी या दोन्ही पुत्राच्या जन्मासाठी नगर येथील शहाशरीफ दर्गा यास नवस केला होता. त्यामुळेच त्यांच्या दोन्ही मुलांची नावे त्यांनी शहाशरीफ या नावावरून ठेवली आहेत.[ संदर्भ हवा ]....

शरीफजी राजे भोसले :-

अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि शरीफजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. त्याच ठिकाणी त्यांची चारशे वर्षांपूर्वी समाधी बांधण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही समाधी हरवली. शरीफजींच्य धर्मपत्नी म्हणजे देवगिरीच्या सोमवंशी यादव कुळातील यादवराजांची कन्या व सिद्धराजांच्या भगिनी दुर्गाबाईसाहेब.

शरीफजीराजे यांना दोन मुले, एक महादजी आणि एक त्रिंबकजी यांचा मुलाचं नाव व्यंकटजी, यांना अहमदनगर भागातील जहागिरी मिळाली होती, त्याना सहा मुले संभाजी, माणकोजी (खानावट घराणे) शहाजी बेळवंडी घराणे शरीफजी, तुकोजी, बाबाजी. आज यातील भोसले वंशज वेगवेगळ्या विभागात आपआपले काम करत आहेत.