Jump to content

शरदिंदू बंदोपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शरदिंदु बंडोपाध्याय या पानावरून पुनर्निर्देशित)
Sharadindu Bandyopadhyay (es); শরদিন্দু বন্দ্যোপাধ্যায় (bn); Sharadindu Bandyopadhyay (fr); Sharadindu Bandyopadhyay (ast); Sharadindu Bandyopadhyay (ca); शरदिंदु बंडोपाध्याय (mr); Sharadindu Bandyopadhyay (de); Sharadindu Bandyopadhyay (pt); Sharadindu Bandyopadhyay (ga); Sharadindu Bandyopadhyay (sl); Sharadindu Bandyopadhyay (pt-br); شاراديندو بانديوپادهياى (arz); ശരദിന്ദു ബന്ദോപാധ്യായ് (ml); Sharadindu Bandyopadhyay (nl); שורודינדו בונדופדהאי (he); ਸ਼ਰਦਿੰਦੂ ਬੰਡੋਪਾਧਿਆਏ (pa); Sharadindu Bandyopadhyay (en); Sharadindu Bandyopadhyay (sq); ଶରଦିନ୍ଦୁ ବନ୍ଦୋପାଧ୍ୟାୟ (or); Шарадинду Бандхопадхай (ru) scrittore (it); বাঙালি লেখক ও চিত্রনাট্যকার (bn); ލިޔުންތެރިއެއް (dv); письменник (uk); Indiaas schrijver (1899-1970) (nl); writer (1899–1970) (en); ଭାରତୀୟ ଲେଖକ (or); scríbhneoir (ga); نویسنده هندی (fa); ਲੇਖਕ (pa); writer (1899–1970) (en) S. Bandyopadhyay (nl); Sharadindu Bandyopadhyay (ml); ଶାରଦିନ୍ଦୁ ବନ୍ଦୋପାଧ୍ୟାୟ (or)
शरदिंदु बंडोपाध्याय 
writer (1899–1970)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावশরদিন্দু বন্দ্যোপাধ্যায়
जन्म तारीखमार्च ३०, इ.स. १८९९
जौनपूर
मृत्यू तारीखसप्टेंबर २२, इ.स. १९७०
पुणे
नागरिकत्व
निवासस्थान
  • Baranagar
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
मातृभाषा
उल्लेखनीय कार्य
पुरस्कार
  • Rabindra Puraskar
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शरदिंदु बंडोपाध्याय किंवा शरदिंदु बंद्योपाध्याय(इ.स.१८९९-१९७०) हे एक बंगाली भाषेत लिहिणारे लेखक व कवी होते. यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे ३० मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बी.ए.पर्यंतचे कॉलेज शिक्षण कलकता येथील विद्यासागर महाविद्यालयात झाले. कॉलेजात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह ’जौबन स्मृति’ १९१९साली प्रकाशित झाला. पाटणा शहरात राहून केलेला कायदेशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मात्र, त्यांनी पूर्णवेळ लेखनास वाहून घेतले. त्यांनी ’व्योमकेश बक्षी’ नावाचा डिटेक्टिव्ह नायक असलेल्या ’व्योमकेश बक्षी' गुप्तहेरकथा लिहिल्या आहेत.

शरदिंदु बंडोपाध्याय यांच्या अन्य विषयांवरील ललितकथा गाजत असतानाच, त्यांची पहिली ’व्योमकेश बक्षी‘ कथा १९३२साली प्रसिद्ध झाली. तिचे नाव ’पाथेर कांटा’. ही ’वसुमती’ मासिकात छापून आली, तर दुसरी ’सत्यान्वेषी’ नामक कथा १९३३मध्ये छापली गेली. पुढील ३५ वर्षांत त्यांनी आणखी ३० ’व्योमकेश बक्षी’ कथा लिहिल्या. त्यांमध्ये काही कादंबऱ्यांचाही समावेश आहे. बंगालीत या रहस्यकथा अतिशय लोकप्रिय झाल्या. या कथांचे दूरचित्रवाणीवरही सादरीकरण झाले आहे, त्यामुळे शरदिंदु बंडोपाध्याय साऱ्या भारताला माहीत झाले..

१९३८मध्ये शरदिंदु मुंबईला आले आणि ’बॉम्बे टॉकीज’ व नंतर अन्य कंपन्यांसाठी ते पटकथा लिहू लागले. १९५२ला मुंबईत असेपर्यंत त्यांनी पटकथा लिहिल्या आणि नंतर ते पुण्याला आले आणि मरेपर्यंत तेथेच राहिले. पुण्यात राहत असताना ते भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, आणि बालकथा आदी ललित साहित्यही लिहीत होते. मात्र त्यांचे मूळ लेखन बंगालीत असे.

’व्योमकेश बक्षी’ रहस्यकथांचे इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. मराठीतले अनुवाद अशोक जैन यांनी केले आहेत. त्यांनी व्योमेकेश कथा तीन भागांत प्रसिद्ध केल्या आहेत. पहिल्या भागात चित्रचोर आणि प्राणिसंग्रहालय या लघुकादंबऱ्या, दुसऱ्या भागात काटेरी रहस्य, जीवघेणी ज्वाळा-पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, टॅरंटुलाचं विष, आणि मृत्युपत्राने घेतला बळी या कथा, तर तिसऱ्या भागात अदृश्य शाई, कंठाहाराचे रहस्य, सत्यान्वेषी, आणि सालिंदराचा काटा या चार कथा आहेत.

शरदिंदु वंद्योपाध्याय याचे निधन पुणे शहरात २२ सप्टेंबर १९७० रोजी झाले.

कथा आणि कादंबऱ्या

[संपादन]
  • अग्निबाण(१९३५) (मराठीत जीवघेणी ज्वाळा-पूर्वार्ध)(व्योमकेश कथा)
  • अचिन पाखी
  • अदृश्य त्रिकोण
  • अद्वितीय
  • अमृतेर मृत्यु
  • अर्थमनार्थम्‌(१९३४) (मराठीत मृत्युपत्रानेच घेतला बळी)(व्योमकेश कथा)
  • उपसंहार(१९३६) (मराठीत जीवघेणी ज्वाळा-उत्तरार्ध)(व्योमकेश कथा)
  • कहे कवी कालिदास
  • कलेर मंदिर (कलेचे मंदिर-ऐतिहासिक कादंबरी)
  • खूंजी खूंजी नारी
  • गौड मल्लार(आधीचे नाव -मौरी नोदिर तीरे)(ऐतिहासिक कादंबरी)
  • चालनार चंदा
  • चित्रचोर (१९५२)(व्योमकेश कथा)(मराठीत चित्रचोर, हिंदीत तसवीर चोर-छायाचित्र चोरणारा)
  • चोरावाली
  • छूया चंदन
  • तिमि संध्यार मेघ
  • तुंगभद्रार तीरे
  • दुर्गरहस्य
  • दुष्टचक्र
  • न्हेयलिर चंदा
  • पाथेर कांटा(१९३२) (मराठीत काटेरी रहस्य)(व्योमकेश कथा)
  • चिडीयाघर (१९५३)(मराठीत प्राणीसंग्रहालय-व्योमकेश कथा)
  • वन्हि-पतंग
  • विशुपाल वध
  • वेणीसंहार
  • मकोरशार(मकर्षर रस-१९३३)(मकडीचा रस)(मराठीत टॅरंटुलाचं विष)(व्योमकेश कथा)
  • मग्न-मैनाक
  • मणिमंडन
  • मरु ओ संघ(हिच्यावर तृषाग्नि नावाचा हिंदी चित्रपट निघाला)
  • रक्तेर डाग(रक्ताचा डाग)
  • रूम नंबर १०२
  • लोहार बिस्किट(लोखंडाचे बिस्किट)
  • व्योमेश ओ वरदा
  • शैलरहस्य
  • सत्यान्वेषी (व्योमकेश कथा)
  • सीमान्त हीरा