Jump to content

व्हॉट्सॲप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हॉट्सअॅप या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हॉट्सॲपचा लोगो

व्हॉट्सॲप (इंग्रजी:WhatsApp) ही एक लोकप्रिय संदेशन प्रणाली (इन्स्टन्ट मॅसेजिंग) आहे. हिच्यामार्फत लोक इंटरनेट वापरून एकमेकांशी चर्चा करतात, संदेश पाठवतात व वाचतात. संदेशासोबत चित्रे, गाणी, व्हीडियो व इतर प्रकारच्या फाईल्स देखील एकमेकांसोबत सामाईक करता येतात. व्हॉट्सॲप प्रणाली आयफोन, अँड्रॉईड, विंडोज फोन इत्यादी सर्व आघाडीच्या स्मार्टफोनवर उपलब्ध असून सप्टेंबर २०१५ मध्ये जगभर व्हॉट्सॲपचे ९० कोटी वापरकर्ते झाले आहेत. मार्क झुकेरबर्ग हे सध्या व्हॉट्सऍप या कंपनीचे मालक आहेत.

व्हॉट्सॲपची निर्मिती २००९ साली ब्रायन ॲक्टन व जॅन कोम ह्या दोन अमेरिकन व्यक्तींनी केली. कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले.[]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणु नोंदी

[संपादन]
  1. ^ Metz, Cade (April 5, 2016). "Forget Apple vs. the FBI: WhatsApp Just Switched on Encryption for a Billion People". Wired. ISSN 1059-1028. April 9, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 13, 2016 रोजी पाहिले.