व्हियाएर्मोसा
Jump to navigation
Jump to search
व्हियाएर्मोसा (स्पॅनिश:Villahermosa; सुंदर गाव) हे मेक्सिकोच्या ताबास्को राज्यातील मोठे शहर आहे. राज्याची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४०,३५९ होती. हे शहर ग्रिहाल्बा नदीकाठी वसलेले आहे.
या शहराची स्थापना २४ जून, १५६४ रोजी दियेगो दि किहेदा या स्पॅनिश व्यक्तीने केली होती.
व्हियाएर्मोसा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मेक्सिकोतील प्रमुख शहरे आणि अमेरिकेतील ह्युस्टनला विमानसेवा उपलब्ध आहे.