व्हिक्टोरिया बेकहॅम
Appearance
व्हिक्टोरिया कॅरोलाइन बेकहॅम (१७ एप्रिल, १९७४:हार्लो, एसेक्स, इंग्लंड - ) ही इंग्लिश पॉप गायिका आणि वस्त्र डिझायनर[मराठी शब्द सुचवा] आहे. ही स्पाइस गर्ल्स या स्त्री संगीतसमूहाचा भाग होती. त्यावेळी ती पॉश स्पाइस या टोपणनावाने ओळखली जायची.
व्हिक्टोरिया बेकहॅमने १९९९मध्ये इंग्लिश फुटबॉल खेळाडू डेव्हिड बेकहॅमशी लग्न केले. त्यांना चार मुले आहेत.