व्यावसायिक अर्थशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यावसायिक अर्थशास्त्र हे आजच्या दैनंदिन व्यवहारात महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्या सर्व ठिकाणी अर्थशास्त्राचा वापर व्यवस्थापकीय आणि उपयोजित अर्थशास्त्र म्हणून होतो. अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत तत्त्वे व संकल्पना यांचा वापर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कसा केला जातो हे आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातून कळते.

व्याख्या[संपादन]

व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी वेगवेगळ्या अर्थ्शास्त्रज्ञांनी व्याख्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

स्पेन्सर व साइगलमनच्या मते, "व्यावसायिक परिस्थितीच्या विश्लेक्षणासाठी अर्थशास्त्रीय कल्पनांचा उपयोग करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय."

ई. टी. ब्रिहाम व जे.एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय." म्हणजेच व्याव्स्थापकेला दैनंदिन जीवनामध्ये जे व्यावसायिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची मदत होते. व्यावसायिक निर्णयांसाठी याचा वापर होतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्न, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापार, इत्यादी स्थूल घटकांशी संबंधीत आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा आभ्यास देखील व्यावसायिक अर्थशास्त्रात होतो. अशा रितीने व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासात सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्राचा समावेश होतो.