वेस्टिन चेन्नई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वेस्टीन चेन्नई हे भारत देशाचे तामिळनाडू राज्याचे चेन्नई राजधानीत चेन्नईच्या दक्षिण उपनगरात 154,वेलाचेरीच्या मुख्य रस्त्यावर दहा मजले असणारे स्टारवूड हॉटेल चेनचे सहावे हॉटेल आहे.[१] या हॉटेलची वेबसाइट starwoodhotels.com/westin आहे.

इतिहास[संपादन]

या हॉटेलचे उद्घाटन फेब्रुवारी 2013 मध्ये झाले. नोवेंबर 2013 मध्ये या हॉटेलने (EEST) म्हणजेच शोभिवंत, अतिशय सुंदर, शांत, आणि मनाला समाधान प्राप्त करून देणारे एशियन स्पेशालिटी रेस्टोरंट चालू केले.[२] प. मोहम्मद अली हे या हॉटेलचे मालक आहेत.

हॉटेल[संपादन]

हे हॉटेल 7792 sq.m. एरिया असणार्‍या जागेवर बांधलेले आहे. या हॉटेल मध्ये 215 खोल्या आहेत.[३] या हॉटेल मध्ये चार आहार आणि शीतपेये ठिकाणे आहेत त्यात एक 24 तास भोजन व्यवस्था, वैशिष्ट्यपूर्ण असे रेस्टोरंट, बार आणि तलावाचे कांठावर रेस्टोरंट यांचा समावेश आहे. फावल्या वेळात वेळ घालविण्यासाठी वेस्टीन वर्कआउट नावाचे जिम, खुल्या वातावरणातील तलाव, स्वर्गीय स्पा नावाचा स्पा, सांघिक धावण्याचे नियोजनासाठी रण वेस्टीन या सुविधा आहेत. आणखी याची विशेषतः म्हणजे येथे 12600sq.ft.(1170sq.m.) पेक्षा जादा आकाराची सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी जागा आहे. त्यात विना खांबांचे दोन गोलाकार खोल्या (बॉल रूम) आणि 12 विश्रांती खोल्या त्यातच भर म्हणून व्यवसाय केंद्र ही आहे. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसर्‍या मजल्यावरील गच्चीवर वर पोहण्याचा तलाव आहे. या हॉटेल मध्ये तीन रेस्टोरंट आहेत तयार एक 24 तास ऋतुमानाप्रमाणे भोजनात आहार देणारे,पॅन एशिया EEST आणि तलाव काठावरचे ग्रिल व बार बेक, याशिवाय आरामात पडून क्रिकेट पहाण्यासाठी बार विल्लौस आहे. तेथे एकदम वरच्या मजल्यावर वेस्टीन ऑफिसर्स क्लब आहे. हॉटेलच्या मध्यबागातील जागेत 35 फूट उंचीचा पाण्याचा धबधबा आहे.

सुविधा[संपादन]

वेस्टीन चेन्नई वेलचेरी रूम्स : क्लब रूम, प्रीमियम रूम्स, डीलक्स रूम्स.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "वेस्टीन ने चेन्नई वेलाचेरी नावाची मालमत्ता उघडली".
  2. ^ "वेस्टीन चेन्नई वेलाचेरी ने EEST उपहारगृह निर्माण केले".
  3. ^ "द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी हॉटेल ची वैशिष्ट्ये".
  4. ^ "स्टारवूड हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ने चेन्नईतील प्रथम मालमत्ता करार केला".