वेश्याव्यवसाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: प्रताधिकार भंग http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/93594793694d92f93e93594d92f93593893e92f

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात. पण पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात. स्त्रियांनी पैसे मोजून पुरुष वेश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकार अस्तित्वात असला, तरी तो अल्प प्रमाणात आढळतो. वेश्याव्यवसायातील व्यक्तीची मोबदला देणाऱ्या अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी असते. पण क्वचित आपल्या ग्राहकाची निवड त्याचे वय, आरोग्य, वंश वा जात असे निकष लावून करणाऱ्या वेश्याही आढळतात.

वेश्याव्यवसाय ही जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय मानला जातो. ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतीय समाजातही वेश्याव्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. इतर अनेकविध कारणांप्रमाणेच काही अनिष्ट अशा धार्मिक व सामाजिक रूढी-परंपरांतूनही या व्यवसायाला चालना मिळाली [→ देवदासी].

मानवसमाज जेव्हा वसाहती करून स्थिर, सामुदायिक जीवन जगू लागला, तेव्हा लैंगिक संबंधांवर अनेक प्रकारचे नीतिनियम व निर्बंध लादण्यात आले. प्रस्थापित ⇨कुटुंबसंस्था व त्यासाठी रूढ अशी ⇨ विवाहसंस्था ही सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यकच होती. त्यामुळे काही प्रकारचे लैंगिक संबंध हे समाजमान्य व प्रतिष्ठेसाठी अनिवार्य ठरले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील निकटवर्ती नात्यागोत्यांतील व्यक्तींना परस्परांत लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी कठोर नियमने अस्तित्वात आली. उदा., आर्इ-मुलगा, वडील-मुलगी, बहिण-भाऊ अशा निकटच्या नात्यांतील ⇨ अगम्य आप्तसंभोग सर्वच समाजांत निषिद्ध मानला जातो. प्रत्येक समाजात विवाहसंस्था भक्कम राखणे, औरस संततीचे संगोपन व कुटुंबसंस्थेचे संवर्धन करणे, ही सामाजिक व्यवस्थेची अविभाज्य अंगे मानली जात. मात्र अनिर्बंधिक लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सामाजिक नियम नेहमी संदिग्ध राहिले. विशेषत: पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. या प्रवृत्तीमधून वेश्या-व्यवसाय हा प्रत्येक समाजात निर्माण झाला. वेश्यावृत्तीला एका बाजूने निषिद्ध मानले जाते व वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित व हीन समजली जाते. तरीदेखील वेश्याव्यवसाय प्रत्यके समाजव्यवस्थेत, प्रत्येक काळात पाय रावून उभा राहिलेला आढळतो.

मानवाचे लैंगिक जीवन हे साधारणत: संस्कार व रूढी यांनुसार आकारित होते. स्त्री-पुरुष संबंधांना सहजप्रवृत्तीनुसार किंवा वैयक्तिक इच्छेनुसार व्यक्त करण्याची पूर्ण मुभा प्रगत मानवी समाजांत नाही. कायद्याने व सामाजिक रूढींमुळे विवाहाखेरीज लैंगिक संबंध ठेवणे अमान्य ठरते, तरीदेखील वेश्याव्यवसायाचे प्रचलन टाळता येत नाही. ह्याला विविध कारणे संभवतात; लैंगिक संबंध केव्हाही व वेगवेगळ्या रूपांत ठेवणे फक्त मानवालाच शक्य असते. वैयक्तिक शारीरिक सुखासाठी तसेच विशिष्ट हेतू साधण्याच्या दृष्टीनेही लैंगिक संबंधांचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा लैंगिक संबंध आर्थिक मोबदल्याकरिता अथवा इतर प्रकारचे हेतू साध्य करण्याकरिता (शारीरिक गरज व प्रजनन सोडून) ठेवले जातात, तेव्हा वेश्यावृत्तीची व वेश्याव्यवसायाची सुरुवात होते. मानवी व्यवहार हे सहज प्रवृत्तीपेक्षा बुद्धिपुरस्सरतेवर अवलंबून असल्याचा हा परिणाम आहे. विशेषत: ज्या समाजात लैंगिक संबंधांवर फारशी बंधने नाहीत, तेथे वेश्याव्यवसायाची सामाजिक प्रश्न म्हणून तीव्रता कमी असते, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या समस्याही सौम्य असतात. उदा., नेदलँड्‌समध्ये वेश्याव्यवसायाला कायद्याने संमती दिलेली आहे. तेथील वेश्यांना उत्पन्नावर कर भरावा लागतो व त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा व इतर कल्याणकारी सोयी उपलब्ध करण्यास सरकार बांधील आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध स्वखुषीने ठेवण्याच्या व्यवहाराला जरी समाजमान्यता नसली, तरी त्यात आर्थिक मोबदल्याची देवाणघेवाण नसल्याने ती वेश्यावृत्ती ठरत नाही [→ विवाहबाह्य मातृत्व]. वेश्याव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुतांश समाजामध्ये हेटाळणीचा असला, तरीदेखील एक सामाजिक वस्तुस्थिती या दृष्टीने ते मानवी व्यवहाराचे अविभाज्य अंग बनले आहे, असेही मत आढळते. मात्र व्यक्तिगत कल्याणाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे.