बांबू
बांबू | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
बांबू जंगल रणपूर,भारत
| ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
जाति | ||||||||||
९२ वंश आणि ५००० जाती |
बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. हा पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले.[१]
प्रकार
[संपादन]पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळ जवळ १४०० बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते.
आशिया खंडातील बांबू
[संपादन]चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात, त्यापासून अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, ७५ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.
बांबू पिकाचे वैशिष्ट्य
[संपादन]जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. [१]बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो.
उत्पादन
[संपादन]बांबूचे आशियामधले उत्पादन गेल्या वीस वर्षांत झपाट्याने वाढले आहे. २००८ मध्ये चीनमधेच बांबूचे उत्पादन २००० मधल्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर ग्रामीण चिनी शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण ५ टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.
शेती
[संपादन]बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षांनंतर त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते.
प्रक्रिया
[संपादन]बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी-कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते.
उपयोग
[संपादन]बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल आणि इतकेच काय डायपरसुद्धा मिळतात. सायकलींच्या फ्रेम्स, स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप संगणकांचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूंपासून बनवल्या जातात.
बांबूची अशी उत्पादने किती कठीण असतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. बांबू किती जुना आहे यावर त्याचा कठीणपणा अवलंबून असतो. तज्ज्ञांच्या मते ५ ते ६ वर्ष जुने बांबूचे पीक पुरेसे कठीण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे फ्लोअरिंग हे लाकडापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नसते.
बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसेंदिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत. उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेले, रेस्टॉरंट, शाळा या सर्व ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्य आहे. ज्यावेळी बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल असा दिवस फारसा दूर नसावा.बांबू बासरी बनवण्या साठी उपयोगी पडतो
बांबूचे प्राण्यांच्या आहारातील स्थान
[संपादन]बांबूची कोवळी पाने, फांद्या, कोंब हे चीनमधील जायंट पांडा व नेपाळ मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे. काही वेळेस उंदीर याची फळे खातात. आफ्रिकेतील जंगलातील गोरिलासुद्धा बांबूचे सेवन करतात.
चित्र दालन
[संपादन]-
वेळु /बांस
-
वेळुची पाने
-
A "Bamboo Cathedral" in Chaguaramas, त्रिनिनाद आणि टोबॅगो.
-
Giant bamboo with person to show relative size.
-
Small, ornamental bamboo look-a-like plant.
-
इक्वाडोर मधील जून बांबूची वाढ
-
बांबू बोनसाय.
-
चीन मधील बांबूचे नक्षीकाम,Qing Dynasty.
-
बांबूपासून बनविलेली सायकलची फ्रेम(१८९६)
-
बांबूपासून विणलेली विकण्यास ठेवलेली भारतातल्या बंगलोरच्या बाजारातील टोपली.