वेडसर प्रेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेडसर प्रेम किंवा ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर (ओएलडी) ही एक प्रस्तावित मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर वेड्यागत प्रेम करते आणि त्याला आपल्या अधीन ठेवण्याचे आणि सतत नजरेसमोर संरक्षित ठेवण्याचे जबरदस्त प्रयत्न करते. काही परिस्थितीत प्रेमात आलेले अपयश किंवा मिळालेला नकार स्वीकारण्यास असमर्थता निर्माण. या आजाराच्या लक्षणांमध्ये त्या व्यक्तीशिवाय घालवलेला वेळ सहन न होणे, त्या व्यक्तीच्या सभोवतालच्या वेडसर कल्पना आणि त्या व्यक्तीची प्रतिमा शोधण्यात, बनवण्यात किंवा पाहण्यात अवाजवी वेळ घालवणे यांचा समावेश होतो.[१]

लक्षणे[संपादन]

DSM-5 किंवा इतर डायग्नोस्टिक मॅन्युअल्समध्ये वेडसर प्रेम हे विशिष्ट मानसिक विकार/आजार म्हणून समाविष्ट नसले तरी ते इतर मानसिक आजारांसोबत असल्याचे मानले जाते.[२] आकर्षणाच्या तीव्रतेनुसार, वेडसर प्रेमी काही परिस्थितीत स्वतःला इजा पोहोचवणे किंवा इतरांसोबत हिंसाचार करण्यासारख्या टोकाच्या वर्तनापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. वेडसर प्रेमाचे मूळ काहीवेळा बालपणातील मानसिक आघातात असते असे मानले जाते आणि हे दीर्घाळापर्यंत टिकू शकते, काहीवेळा यात मानसोपचार करणे आवश्यक असतो.[३]

वेडसर प्रेमाची पुढीप्रमाणे काही लक्षणे आहेत.

 1. एखाद्या व्यक्तीबद्दल अत्याधिक आकर्षण असणे.
 2. नकारात्मक विचार आणि कृती.
 3. नातेसंबंधात तीव्र भावना.
 4. समोरच्या व्यक्तीला आयुष्यातून न जाऊ देणे आणि त्यासाठी त्याला धमकी देणे.
 5. अत्याधिक मत्सर.
 6. लघु संदेश (एस एम एस), ईमेल किंवा फोन कॉलद्वारे वारंवार संदेश पाठवणे.
 7. समोरच्या व्यक्तीच्या कृतींचे निरीक्षण करणे.
 8. तुमचे नियंत्रण नसलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल सतत विचार करणे.
 9. सदरील व्यक्ती आणि त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा.
 10. त्या व्यक्तीचा नकार स्वीकारण्यास सक्षम नसणे.
 11. त्याच्याबद्दल इतरांशीही बोलणे, त्याचा उल्लेख करण्याचे निमित्त शोधणे.
 12. त्याच्यामुळे इतर नाती विसरणे
 13. त्या व्यक्तिला ब्लॅकमेल करणे, कोणत्याही मार्गाने तुमच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न करणे.[४][५]

संस्कृतीत[संपादन]

फ्रेंच लेखक मार्सेल प्रुस्त यांनी À la recherche du temps perdu मध्ये वेडसर प्रेमाचे विच्छेदन केले आहे. [६]

डर, अंजाम आणि दस्तक सारख्या अनेक हिंदी चित्रपटात खलनायकाला वेडसर प्रेमी म्हणून दाखवले आहे.[७]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Susan Forward; Craig Buck (१ जानेवारी २००२). Obsessive Love: When It Hurts Too Much to Let Go. Bantam Books. ISBN 978-0-553-38142-9.
 2. ^ Obsessive Love Disorder, from Healthline
 3. ^ Derrow, Paula. (१४ जानेवारी २००४). "When normal love turns obsessive". Cosmopolitan. १८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "संकेत जो बताते हैं की आपका प्यार जुनून है, प्यार नहीं!". १९ जून २०२३ रोजी पाहिले.
 5. ^ "ऑब्सेसिव लव डिसऑर्डर: जब प्यार का जुनून 'मानसिक बीमारी' बन जाता है". बी बी सी न्यूझ. १९ जून २०२३ रोजी पाहिले.
 6. ^ H Moss, The Magic Lantern of Marcel Proust (2012) p. 51
 7. ^ Pimprikar, Aabha; Jha, Geetanjali (February 2022), "Love Special - Mad in Love: Psychological Disorders" (PDF), Mind Matters (11)