Jump to content

वेठबिगार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेठबिगार म्हणजे आपले इच्छेविरुद्ध वेठबिगारी करणारा पुरुष/स्त्री अथवा बालकामगार अथवा वेठीस धरलेला व बिगारी कामे करणारा.सहसा, अशा व्यक्तीने, स्वतः अथवा त्याचे जवळचे नातेवाईकाने(आई, वडील भाऊ इत्यादी), उधार अथवा अग्रीम म्हणून रक्कम अथवा वस्तू घेतलेली असते. ती रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, त्याला अथवा त्याचे संपूर्ण कुटुंबाला, त्या रकमेची परतफेड म्हणून, आवश्यक पूर्तता होईपर्यंत श्रम मजूरी अथवा सांगीतलेली कामे करावी लागतात. उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करण्यासाठी मेहनत करण्याचा एक प्रकार याचे विरुद्ध हा प्रकार आहे.यात मुक्त भाव असत नाही. वेठबिगारास आपले ईच्छेविरुद्ध काम करावे लागते.ही एक प्रकारची गुलामीच होय.

सहसा, वेठबिगारी ही आजन्म असते. कारण रक्कम पूर्ण फेडण्यात आली असे ती रक्कम देणारा कधीच घोषित करीत नाही. मुक्त करण्याची मागणी केल्यास, अजून व्याज बाकी आहे असे सांगण्यात येते.