वेको (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेको अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. ब्राझोस नदीच्या काठी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,२४,८०५ तर आसपासची उपनगरे धरून २,३४,९०६ होती.

हे शहर मॅकलेनन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.