"विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन
 
No edit summary
ओळ ५०: ओळ ५०:


<div style="text-align:center;">
<div style="text-align:center;">
{{Clickable button 2|योगदान सादर करा|url=https://tools.wmflabs.org/fountain/editathons/asian-month-2020-mr|class=mw-ui-progressive}}
{{Clickable button 2|योगदान सादर करा|url=https://fountain.toolforge.org/editathons/asian-month-mr-2020|class=mw-ui-progressive}}
</div>
</div>



१८:३६, १ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

विकिपीडिया आशियाई महिना

विकिपीडिया आशियाई महिना हे एक ऑनलाईन अभियान आहे. याचा उद्देश आशियाई देशांमधील समूहांमध्ये मैत्री, एकात्मतेची भावना वाढावी आणि विविध प्रदेशांतील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान वाढावे हा आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर हे अभियान राबविले जाते. या उपक्रमात मराठी विकिपीडियामध्ये चांगल्या लेखांची भर पडावी अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकी संपादकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी, आशियाई समुदायामध्ये असलेले मैत्रीचे नाते वृद्धींगत व्हावे हाही एक उद्देश आहे. या उपक्रमात तुम्हाला सहभागी म्हणून फक्त ४ लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पुर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चारपेक्षा जास्त लेखही लिहू शकता. या उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास विकिपीडिया आशियाई दूत म्हणून घोषीत केले जाईल.

नियम

थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.

  • हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०२० ०:०० (UTC) आणि डिसेंबर ०७, २०२० २३:५९ (UTC) स्वतः बनवलेला असला पाहिजे.
  • सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.(महितीचौकट, साचा सोडून)
  • सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
  • लेख मशीन रूपांतर नसावा व भाषा शुद्ध असली पाहिजे.
  • लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उदा. कॉपीराईट उल्लंघन, उल्लेखनियता स्पष्ट असावी)
  • लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  • सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
  • सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
  • आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
  • प्रत्येक भाषेतील परीक्षक स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे निर्धारित करतील.
  • जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून WAM पोस्टकार्ड मिळेल.
  • तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.

या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.

संदर्भ दुवे

आयोजक

  1. टायवेन गोन्साल्वीस

साइन अप

आता साइन अप करा आणि तुमचे योगदान द्या .

लेख सादर करा

आशियाई महिन्यासाठी मराठी विकिपीडियावर योगदान? आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा.