"खगोलशास्त्रीय संकल्पना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: खगोलशास्त्राशी संबंधित अशा अनेक संकल्पना आहेत, त्या जर नीटपणे म... |
(काही फरक नाही)
|
२३:३३, २५ मे २०१२ ची आवृत्ती
खगोलशास्त्राशी संबंधित अशा अनेक संकल्पना आहेत, त्या जर नीटपणे माहीत नसतील तर खगोलशास्त्राचे वाचन केले तरी त्यातून नक्की अर्थबोध होत नाही. अशा काही संकल्पनांची येथे माहिती दिली आहे . ---
- भगोल
- पृथ्वीच्या गोलाला भूगोल आणि आकाशाच्या गोलाला भगोल म्हणतात.
- खगोल
- निरीक्षकाला आकाशाचा जो भाग दिसतो त्याला खगोल म्हणतात.
- क्रांतिअंश, विषुवांश
- भूगोलावर जसे अक्षांश आणि रेखांश, तसे भगोलावर क्रांतिअंश आणि विषुवांश. भूगोलावरील शून्य अंशाचे वृत्त म्हणजे विषुववृत्त आणि ९० अंशाचे वृत्त म्हणजे पृथ्वीचे उत्तर-दक्षिण ध्रुव. त्याच धर्तीवर भगोलाचे वैषुविक वृत्त आणि उत्तर-दक्षिण शाश्वतबिंदू होत.
- क्रांतिवृत्त आणि होरावृत्त
- वैषुविक वृत्ताशी काढलेल्या समांतर वृत्तांना क्रांतिवृत्त म्हणतात, आणि वैषुविक वृत्ताशी काटकोनात असणाऱ्या व उत्तर दक्षिण शाश्वतबिंदूंतून जाणाऱ्या वृत्तांना होरावृत्ते म्हणतात.
- खगोलावरचे सहनिर्देशांक--उन्नतांश आणि क्षित्यंश
- पृथ्वीच्या विषुववृत्तापासून जसजसे तिच्या ध्रुवबिंदूकडे जावे तसतशी उन्नति शून्य अंशापासून नव्वद अंशांपर्यंत चढते. उत्तरेकडील उन्नतांश+(अधिक) आणि दक्षिणेकडील उन्नतांश- (उणे) मानतात. क्षितिजपातळीपासून एका ठरावीक दिशेपासून दुसऱ्या दिशेपर्यंत मोजलेले कोनात्मक अंतर म्हणजे क्षित्यंश होय. क्षित्यंश पूर्वेकडे शून्य अंश ते +१८० अंशापर्यंत अणि पश्चिमेकडे शून्य अंश ते -१८० अंशापर्यंत असू शकतात.