"हणमंत नरहर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
==सुधांशु यांनी लिहिलेली आणि गाजलेली गीते== |
==सुधांशु यांनी लिहिलेली आणि गाजलेली गीते== |
||
* इथेच आणि या बांधावर |
|||
* गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी |
* गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी |
||
* गोकुळाला वेड लाविले |
|||
* दत्तगुरू सुखधाम |
* दत्तगुरू सुखधाम |
||
* दत्त दिगंबर दैवत माझे |
* दत्त दिगंबर दैवत माझे |
||
ओळ ४३: | ओळ ४५: | ||
* देव माझा विठू सावळा |
* देव माझा विठू सावळा |
||
* प्रभू या हो |
* प्रभू या हो |
||
* भुकेला भक्तीला भगवान |
|||
⚫ | |||
* भुलविलेस साजणी |
|||
* मनी माझिया नटले गोकुळ |
|||
* माझ्या मनात विणिते नाव |
|||
* या धुंद चांदण्यात तू |
|||
* या मुरलीने कौतुक केले |
* या मुरलीने कौतुक केले |
||
⚫ | |||
* स्मरा स्मरा हो |
|||
* हिरवे पिवळे तुरे उन्हाचे |
|||
==पुरस्कार आणि मानसन्मान== |
==पुरस्कार आणि मानसन्मान== |
००:५८, २१ मे २०१२ ची आवृत्ती
काव्यतीर्थ कवी सुधांशु (जन्म, औदुंबर(सांगली): ६ एप्रिल१९१७; मृत्यू : सांगली १८-११-२००६) यांचे पूर्ण नाव हणमंत नरहर जोशी. हे भावगीते लिहिणारे कवी असून दत्तभक्त होते.
इ.स. १९३७पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे कवितासंग्रह झाले.
त्यांच्या गीतदत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले. भारत गायन समाजात झालेल्या कार्यक्रमाला तर मास्टर कृष्णराव, श्री मारूलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा.द. खेर यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती.
कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स.१९६०मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले.
औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशुंनी १९३९पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात.
१८ नोव्हेंबर २००६ला कवि सुधांशु यांचे निधन झाले.
कवी सुधांशुंचे कवितासंग्रह
- कौमुदी
- गीतदत्तात्रय
- गीतदत्तात्रयाचे संस्कृत भाषांतर
- गीतसुगंध
- गीत सुवर्ण
- गीतसुधा
- गीत सुषमा
- जलवंती
- झोपाळा
- दत्तगुरूंची गाणी
- यात्री
- विजयिंनी
- श्रीदत्त गीते
- सुंदर कालिंदीकाठी
- स्वरभावसुधा
सुधांशुंचे गद्यलेखन
- खडकातील झरे (कथासंग्रह)
- चतुरादेवी (बालवाङ्मय)
- दत्तजन्म एकांकिका
- सुभाषकथा (बालवाङ्मय)
सुधांशु यांनी लिहिलेली आणि गाजलेली गीते
- इथेच आणि या बांधावर
- गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी
- गोकुळाला वेड लाविले
- दत्तगुरू सुखधाम
- दत्त दिगंबर दैवत माझे
- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
- देव माझा विठू सावळा
- प्रभू या हो
- भुकेला भक्तीला भगवान
- भुलविलेस साजणी
- मनी माझिया नटले गोकुळ
- माझ्या मनात विणिते नाव
- या धुंद चांदण्यात तू
- या मुरलीने कौतुक केले
- रुद्राक्षांच्या नकोत माळा
- स्मरा स्मरा हो
- हिरवे पिवळे तुरे उन्हाचे
पुरस्कार आणि मानसन्मान
- कवी सुधांशुंना शंकराचार्यांकडून काव्यतीर्थ ही पदवी मिळाली
- भारत सरकारकडून इ.स.१९७४मध्ये पद्मश्री
- मराठी साहित्य परिषदेकडून कवि यशवंत पुरस्कार
- एका विद्यापीठाकडून डी.लिट.
- सांगलीकरांकडून सांगलीभूषण हा पुरस्कार