"अनुपमा उजगरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. अनुपमा निरंजन उजगरे''' या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या... |
(काही फरक नाही)
|
१४:४३, १३ मे २०१२ ची आवृत्ती
डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य : ठाणे(पश्चिम), महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर कृ. उजगरे, हेही साहित्यिक होते.
डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
अनुपमा उजगरे यांचे प्रकाशित साहित्य
- जाण (कथासंग्रह)
- तुम्हाला काय वाटते?(वैचारिक लेखसंग्रह)
- निबंधलेखन
- परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य - सन १५४२ ते १९६० (माहितीग्रंथ)
- सांगी (काव्यसंग्रह)
अनुपमा उजगरे यांनी संपादित केलेली पुस्तके
- सोपी सुभाषिते - एकलव्य प्रकाशन (इ.स.२०००)
- काव्य भाषा - एकलव्य प्रकाशन (इ.स.२०००)
- काळोखातील कवडसे (अंध कवींच्या कविता) (इ.स.२०००)
- काळोखातील तिरीप (अंध लेखकांचे ललित गद्य लेखन) (इ.स.२०००)
- महाराष्ट्राबाहेरील मराठी - मॅजेस्टिक प्रकाशन (इ.स.२००१)
- ज्ञानोदय (नियतकालिक) (इ.स.२००३-२००४)
- इथे ओशाळला विधाता (शैलजा बेडेकर यांचे चरित्र)(इ.स.२००६)
- तू बोलाविले सेवा कराया डॉ. रत्नाकर साळवी यांचे आत्मचरित्र) (इ.स.२००८)
अनुपमा उजगरे यांनी सादर केलेले कार्यक्रम
- मर्ढेकरांपासून आजपर्यंत
- कवितेच्या काठावर
- इंदिरा संतांची कविता
- स्मृतिचित्रे
अनुपमा उजगरे यांना मिळालेले पुरस्कार
- शोभना भडसावले पुरस्कार १९९७
- मराठी साहित्य परिषद(पुणे) यांच्या तर्फेचा कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कुसुमाग्रज पुरस्कार २००४
- कवी. रा.ना. पवार स्मृतिपुरस्कार(सोलापूर) २००४
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रतिष्ठान (नाशिक) यांच्या तर्फे विशाखा पुरस्कार २००४
- कविवर्य कृ.ब. निकुंब काव्यपुरस्कार(बेळगाव) २००४
- कोकण मराठी साहित्य परिषद(रत्नागिरी) यांचा आरती प्रभू पुरस्कार २००५
- पद्मगंधा प्रतिष्ठान(नागपूर) यांचा कै. विठ्ठलराव बोबडे काव्य पुरस्कार २००५
- यूआरएल फाउंडेशन(मुंबई)यांचा साहित्य गौरव पुरस्कार २००६
- आशीर्वाद पुरस्कार(नुंबई) २००६