"भाऊराव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लक्ष्मण बापुजी ऊर्फ '''भाऊराव कोल्हटकर''' हे मराठी रंगभूमीवरचे गाय...
(काही फरक नाही)

२३:२१, २४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. त्यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ ला झाला होता. फारसे न शिकलेलेभाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. साधे कारकून असले लोक बडोद्यात त्यांना गायक म्हणून ओळखत.

अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या नाटकांत स्त्री-भूमिका करण्यासाठी सुंदर रूप आणि गोड आवाज असलेल्या भाऊरावांची निवड केली. इ.स. १८८२ ते १८८९पर्यंत भाऊराव कोल्हटकरांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर १९००पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या.

त्यांच्या गाजलेल्या भूमिका
--
  • १८८२मध्ये शाकुंतल नाटकात - शकुंतला
  • १८८२ ते १८९७ सौभद्रमध्ये- सुभद्रा
  • १८८४मध्ये रामराज्यवियोगमध्ये - मंथरा
  • १८८९मध्ये विक्रमोर्वशीय नाटकात - उर्वशी
  • १८९३मध्ये पुंडरीक (नाटक - शापसंभ्रम)
  • १८९५मध्ये चारुदत्त (मृच्छकटिक)
  • १८८९मध्ये शूरसेन (वीरतनय)
  • १८९९मध्ये कोदंड (नाटक - शारदा)

अप्रतिम अभिनयामुळे आणि गोड गळ्यामुळे भाऊराव कोल्हटकर यांच्या भूमिका लोकांना अतिशय आवडत. लोक त्यांना प्रेमाने भावड्या म्हणत. पुरुष भूमिका करताना त्यांच्या चढ्या, पल्लेदार आणि सुरेल आवाजामुळे भूमिकांना चांगला उठाव येई.

(अपूर्ण)