"मधुकर सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''मधुकर सामंत''' हे प्रेक्षकांसमोर विनोदी मराठी कार्यक्रम सादर कर... |
(काही फरक नाही)
|
१२:४१, ३१ मार्च २०१२ ची आवृत्ती
मधुकर सामंत हे प्रेक्षकांसमोर विनोदी मराठी कार्यक्रम सादर करणारे एक कलावंत आहेत. त्यांच्या धो धो हसा, ध्यानस्थ बसा या कार्यक्रमाचा २००वा प्रयोग, ३१ मार्च २०१२ला पुणे शहरात भोसलेनगरमध्ये झाला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर मधुकर सामंत यांना आपल्या अंगभूत कलागुणांचा समाजाला थोडाफार उपयोग करून द्यावा असे वाटले. त्यातून लोकांना चार घटका आनंद देणारा ,मनमुराद हसावयास लावणारा ’धो धो हसा, ध्यानस्थ बसा’ हा कार्यक्रम जन्माला आला. माणसांमाणसांमधील ताणतणावाचे संबंध, घरातील बिघडलेले नातेसंबंध, समाजात बोकाळलेला चंगळवाद, व्यसनाधीनता, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर उतारा म्हणूनही या कार्यक्रमाची निर्मिती झाली. मुळात मधुकर सामंत हे लेखक, कवी आणि नाट्यकलावंत असल्यामुळे त्यांनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या या कविता, विनोदी प्रसंग, कथा, किस्से आणि विचाराला चालना देणारे अनेकविषय असल्याने, या कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळाले.