"आनंदीबाई किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: आनंदीबाई शंकरराव किर्लोस्कर (जन्म : १९०५, टिलाटी, जिल्हा सोलापू... |
(काही फरक नाही)
|
२३:०१, ११ मार्च २०१२ ची आवृत्ती
आनंदीबाई शंकरराव किर्लोस्कर (जन्म : १९०५, टिलाटी, जिल्हा सोलापूर; मृत्यू :१७ सप्टेंबर १९४२,किर्लोस्करवाडी) या प्रसिद्ध मराठी उद्योजक शं.वा.किर्लोस्कर यांच्या पत्नी, आणि स्त्री मासिकाच्या संपादिका, शांताबाई किर्लोस्कर यांच्या मातोश्री. आनंदीबाई किर्लोस्कर या स्वत: कथालेखिका, नाटककार आणि संपादिका होत्या. अध्यापनशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या आनंदीबाई, किर्लोस्करवाडीतील प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करीत. स्त्री मासिकाच्या संपादनात त्यांचा वाटा असे.
त्यांनी तीन कथासंग्रह आणि एक पुरुषपात्रविरहित नाटक लिहिले.स्त्रियांच्या व्यथा जाणवून देणे आणि त्यांच्या समस्यांना तोंड फोडणे, हा आनंदीबाईंच्या लेखनामागचा हेतू, त्यांचे लिखाण वाचले की वाचकाला स्पष्टपणे जाणवतो. समाजातील रूढीप्रियता व स्त्रियांबद्दलची अनुदार दृष्टी आणि त्यामुळे होणारी स्त्रियांची कुचंबणा त्यांनी आपल्या कथांद्वारे समाजापुढे मांडला. स्त्रियांच्या मनाचा होणारा कोंडमारा आणि त्यांच्या अंतरंगातील दुःख आणि विधवांवर व मोलमजुरी करण्यार्या स्त्रियांवर होणारे अन्याय त्यांनी आपल्या कथांतून चित्रित केले आहेत. लब्धप्रतिष्ठित म्हणवल्या जाणार्या स्त्रियांची आतल्याआत होणारी घुसमटीची जाणीव, आनंदीबाई किर्लोस्करांच्या कथांनी वाचकांपर्यंत पोचवली. स्त्रियांच्या अंतरंगातील दु:खे हळुवारपणे रेखाटताना, तंत्राचे भान ठेवल्यामुळे त्यांच्या कथा आटोपशीर झाल्या आहेत.
नव्या वाटा या त्यांच्या पुरुषपात्रविरहित नाटकात आनंदीबाईंनी परित्यक्ता, प्रौढ कुमारिका यांच्या जीवनविकासाठी नव्या वाटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विवाहपद्धतीतील दोष नाहीसे करून, स्त्रीजीवन सुखकारक करण्यासाठी नव्या वाटा चोखाळण्याचा मार्ग त्यांनी आपल्या ’नव्या वाटा’ या नाटकातून सुचवल्या आहेत. कथासंग्रह आणि नाटकाव्यतिरिक्त आनंदीबाईंनी काही श्रुतिकाही लिहिल्या आहेत.
आनंदीबाई किर्लोस्करांचे प्रसिद्ध लेखन
- श्रुतिका :
- कथासंग्रह:
१. अंतरंग (इ.स.१९४६)
२. ज्योती (इ.स.१९४४)
३. प्रतिबिंब (इ.स.१९४१)
- नाटक :
१. नव्या वाटा (इ.स.१९४१).