"असंगत नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''असंगत नाट्य''' किंवा '''न-नाट्य''' म्हणजे इंग्रजीत ’द थिएटर ऑफ अॅबस... |
(काही फरक नाही)
|
१५:४१, ६ मार्च २०१२ ची आवृत्ती
असंगत नाट्य किंवा न-नाट्य म्हणजे इंग्रजीत ’द थिएटर ऑफ अॅबसर्ड्स’ हा नाटकांमधला एक विशिष्ट प्रकार आहे. या नाट्यप्रकाराला मराठीच्या संदर्भात व्यस्ततावादी रंगभूमी असे नाव, रा.ग.जाधव यांनी दिले आहे. विनाशाकडे चाललेल्या जगात माणसाच्या नियतीवर नियंत्रण ठेवू पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करणार्या मानवतेचे व्यस्त दर्शन अशा नाटकांतून होते. जो माणूस आपल्या धार्मिक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक मुळापासून उखडलेला आहे अशी माणसाची कथा या असंगत नाटकातून सादर केली जाते. अशी नाटके लिहिणार्या नाटककारांनी जगाचे जे वेगळे दर्शन घेतले, त्याची त्यांनी रंगमंचभाषा निर्माण केली आणि ते निरर्थ-निरालंब अनुभव नाटकरूपाने सादर केले.
असंगत नाट्यासाठी झालेला भाषेचा विचार, हा मुळातच माणसामाणसांमधील संवाद नाहीसा झाला असताना, वर वरचे औपचारिक संवाद चालू ठेवण्याच्या तिटकार्यातून मिर्माण झालेला असतो. प्रेमातील कूट प्रश्न, मैत्रीचे मायाजाल, माणसाच्या विषण्णतेतून बाहेर पडणारे प्रेमकारण आणि माणसाच्या एकाकीपणाचे कवच न भेदू शकणारे प्रेम आणि मैत्री अशा अनेक सूत्रांवर ही नाटके आधारलेली असतात. नाटकांतून जेथे संवाद साधत नाही, तेथे तो चालू ठेवण्याचा उठवळ यत्न म्हणजे लाकडी सामानाशी संवाद केल्यासारखे आहे, हे या नाटकांतून दर्शवले जाते.
असंगत नाटके लिहिणारे पाश्चात्त्य नाटककार
- अॅन नेलिको
- अझॅन योनेस्को
- आंतोन आर्तो
- आपॉलिनेर
- आर्थर आदामॉव्ह
- एडवर्ड आल्बी
- एन.एफ. सिम्पसन
- झां झने
- सॅम्युएल बेकेट
- हॅरॉल्ड पिंटर, वगैरे.
पाश्चात्त्य नाटककारांकडून स्फूर्ती घेऊन मराठीत न-नाट्य लिहिणारे नाटककार
- अच्युत वझे
- चंद्रकांत देशपांडे
- प्रशांत दळवी
- रघू दंडवते
- शफाअत खान
- सतीश आळेकर, वगैरे.
मराठीतील असंगत नाट्ये
- खुर्च्या
- चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
- दगड का माती
- बेगम बर्वे
- महानिर्वाण
- साय-साखर, वगैरे.