"आशा पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''आशा पोतदार''' (जन्म: इ.स.१९३९; मृत्यु: २००६)ह्या मराठी नाट्य-चित्रपट... |
(काही फरक नाही)
|
१५:२९, १५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
आशा पोतदार (जन्म: इ.स.१९३९; मृत्यु: २००६)ह्या मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री होत्या. त्यांच्या पतीचे नाव दिनेश गुप्ता. ६ एप्रिल २००६ रोजी बॉम्बे सेंट्रल येथील जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी आधीची चार वर्षे त्या ब्रेस्ट कॅन्सरने आजारी होत्या. शेवटच्या सहा महिन्यांत त्यांचा आजार बळावला होता. मृत्युसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या.
=कारकीर्द
इ.स.१९७०च्या दशकात आशा पोतदार यांचे अनेक मराठी चित्रपट गाजले. ’वावटळ’ चित्रपटाच्या त्या नायिका होत्या तर ’देवकीनंदन गोपाळा’मध्ये त्यांनी गाडगेबाबांच्या पत्नीचे काम केले होते.
त्यांनी प्रभाकर पणशीकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभू यांच्या सोबत अनेक नाटकांतून चमकदार भूमिका केल्या. 'अमृताची वेल', 'तो राजहंस एक' ही त्यांची प्रमुख नाटके. 'तो मी नव्हेच' या नाटकाच्या कानडी प्रयोगातही त्यांनी काम केले होते. 'वावटळ' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता. 'देवकीनंदन गोपाळा', 'जय संतोषी माँ' असे अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी भोजपुरी आणि राजस्थानी चित्रपटांतूनही कामे केली होती. त्या उत्तम नर्तकी होत्या व नृत्यप्रशिक्षणाचे कामही त्या करीत असत.
नाटके आणि त्यांतील (भूमिका)
- अमृताची वेल
- एक असतो राजा
- एखाद्याचं नशीब (ताई)
- कथा कुणाची व्यथा कुणाला (मुग्धा)
- कशी वैरिण झाली रात (कांचन)
- झोपी गेलेला जागा झाला
- तो मी नव्हेच (कानडी रूपांतर)
- तो राजहंस एक (द्रौपदी)
- दिनूच्या सासूबाई राधाबाई
- नरो वा कुंजरो वा
- प्रपंच करावा नेटका (ताई)
- प्रेमा तुझा रंग कसा (सुनील, बब्बड)
- भारती (वेडी)
- माते तुला काय हवंय (गौरी)
- मेघमल्हार (लतिका)
- राव जगदेव मार्तंड
चित्रपट आणि त्यांतील भूमिका
गाजलेली गाणी
- ह्यो मेला माज्याकडं कवापास्नं बगतोय (देवकीनंदन गोपाळा)
सत्कार आणि पुरस्कार
- भगिनी निवेदिता प्रतिष्ठानकडून सन्मानपत्र आणि पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा अभिनयाचा पुरस्कार