"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: en:Waman Gopal Joshi |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वामन गोपाळ जोशी (जन्म : १८८१; मृत्यू : ३ जून १९५६) हे मूळचे समशेरपूरचे. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंतच झाले होते. परंतु शिक्षणासाठी नाशिकला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरु केले. |
|||
वामन गोपाळ जोशी (१८८१ - १९५६) |
|||
त्याचवेळी इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहकार्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात त्यावेळी अकोल्यात असलेले वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते १९३० च्या "जंगल सत्याग्रहात" अग्रभागी राहिले. म.गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. |
|||
ते स्वातंत्रवीर असल्याने लोक त्यांना वीर वामनराव जोशी या नावाने ओळखू लागले. वामनराव देशभक्त आणि क्रांतिकारक तर होतेच, पण ते एक उत्तम लेखक, नाटककार, कवी आणि पत्रकार होते. त्यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्ष” या नाटकाव इंग्रज सरकारने बंदी घातली होती. |
|||
आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमरावतीला स्थायिक झाले होते. त्यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाट्यगृह]]आहे. |
|||
==वीर वामनराव जोशींची पुस्तके आणि नाटके== |
|||
* नाटके : |
|||
** धर्मसिंहासन |
|||
** रणदुंदुभि |
|||
** राक्षसी महत्त्वाकांक्षा |
|||
** |
|||
* पुस्तके : |
|||
** चंद्रपूरची महाकाली |
|||
** राष्ट्रपिता महात्मा गांधी |
|||
** शीलसंन्यास |
|||
==वीर वामनराव जोशी यांची गाजलेली नाट्यगीते== |
|||
* आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७) |
|||
* जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७) |
|||
* दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७) |
|||
* परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७) |
|||
* वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७) |
|||
पहा: [http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Veer_Wamanrao_Joshi आठवणीतील गाणी] |
|||
[[en:Waman Gopal Joshi]] |
[[en:Waman Gopal Joshi]] |
१६:३५, २ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
वामन गोपाळ जोशी (जन्म : १८८१; मृत्यू : ३ जून १९५६) हे मूळचे समशेरपूरचे. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंतच झाले होते. परंतु शिक्षणासाठी नाशिकला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरु केले.
त्याचवेळी इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहकार्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात त्यावेळी अकोल्यात असलेले वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते १९३० च्या "जंगल सत्याग्रहात" अग्रभागी राहिले. म.गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
ते स्वातंत्रवीर असल्याने लोक त्यांना वीर वामनराव जोशी या नावाने ओळखू लागले. वामनराव देशभक्त आणि क्रांतिकारक तर होतेच, पण ते एक उत्तम लेखक, नाटककार, कवी आणि पत्रकार होते. त्यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्ष” या नाटकाव इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमरावतीला स्थायिक झाले होते. त्यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृहआहे.
वीर वामनराव जोशींची पुस्तके आणि नाटके
- नाटके :
- धर्मसिंहासन
- रणदुंदुभि
- राक्षसी महत्त्वाकांक्षा
- पुस्तके :
- चंद्रपूरची महाकाली
- राष्ट्रपिता महात्मा गांधी
- शीलसंन्यास
वीर वामनराव जोशी यांची गाजलेली नाट्यगीते
- आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
- जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
- दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
- परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
- वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
पहा: आठवणीतील गाणी