Jump to content

"चिंदोडी लीला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''चिंदोडी लीला''' ह्या कानडी रंगभूमीवरच्या एकविख्यात अभिनेत्री ह...
(काही फरक नाही)

००:०६, २ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

चिंदोडी लीला ह्या कानडी रंगभूमीवरच्या एकविख्यात अभिनेत्री होत्या. त्यांचा जम इ.स. १९३७ मध्ये आणि मृत्यू २२-१-२०१० रोजी झाला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षालाच झाली. पुढे सुमारे साठाहून अधिक वर्षे त्या कानडी नाटकांमधून अभिनय करीतच राहिल्या. त्यांनी भूमिका केलेल्या 'पोलिसना मगलू'(पोलिसाची मुलगी) या नाटकाचे तब्बल ४५००प्रयोग झाले,आणि या उच्चांकाला 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळाले. लीलाबाई कर्नाटक नाटक अ‍ॅकॅडमीच्या सुमारे ३०वर्षे अध्यक्ष होत्या. त्या सुरुवातीला बेळगाव नगरपालिकेच्या नगरसेवक होत्या. निवडून येण्यासाठी बेळगावच्या मराठी मतदारांचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी 'छत्रपती शिवाजी' या नाटकात भूमिका करून नाटकाचा प्रयोग बेळगावमध्ये केला होता. नंतरच्या काळात सुमारे ६ वर्षे त्या कर्नाटक विधान परिषदेच्या नामदार होत्या. चिंदोडी लीला यांनी ५८नाटकांमध्ये भूमिका केल्या आणि या नाटकांचे एकूण जवळजवळ २०००० खेळ झाले.

चिंदोडी लीला यांनी नाट्यलेखनही केले होते. त्यांनी लिहिलेल्या 'हळ्ळी हुडुगी'(ग्रामकन्या) या नाटकाचे सुमारे१०००० प्रयोग झाले.ज्यावेळी हे नाटक बेळगावमध्ये होत होते तेव्हा राज कपूरचा 'जिस देश में गंगा बहती है' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, परंतु प्रेक्षकांची गर्दी 'हळ्ळी हुडुगी'कडे असल्याने तो सिनेमा जिथे लागला होता ते चित्रपटगृह ओस पडले होते. चिंदोडी लीला यांनी २० कानडी चित्रपटातही कामे केली. त्यांतले काही असे: 'कित्तूर चेन्नम्मा', 'गाली गोपुर', 'कृष्णदेवराय', 'शरपंजर' इत्यादी. चिंदोडी लीला यांनी निर्मित केलेल्या 'हंसलेखा आणि'पंचाक्षरी गवयी' या चित्रपटांनी अनेक पुरस्कार जिंकले.

बाईंच्या नावाने बेळगावमध्ये आत्तापर्यंत चिंदोडी लीला रंगमंदिर नावाचे नाट्यगृह होते. सप्टेंबर २०११मध्ये ते पाडायला सुरुवात झाली. आता तेथे गणपती विसर्जनासाठी मोठा हौद होणार आहे.

चिदोडी लीला यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे झालेले सन्मान

  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
  • आंध्र प्रदेश सरकारच्या संगीत नाटक अ‍ॅकॅडमीचा कृष्णदेवराय पुरस्कार
  • गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 'पोलिसना मगलू' या नाटकाच्या उच्चांकी ४५०० खेळांची नोंद