Jump to content

"गणेश श्रीकृष्ण खापर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गणेश श्रीकृष्ण ऊर्फ दादासाहेब खापर्डे(जन्म : इंगरोली, २७ ऑगस्ट १८...
(काही फरक नाही)

१३:२२, २३ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

गणेश श्रीकृष्ण ऊर्फ दादासाहेब खापर्डे(जन्म : इंगरोली, २७ ऑगस्ट १८५४; मृत्यू : १ जुलै १९३८) हे एक विख्यात भारतीय मराठी वकील, विद्वान, राजकीय चळवळींशी संबंध असणारे मराठी गृहस्थ होते. त्यांचा जन्म वर्‍हाडमधल्या इंगरोली या गावात झाला होता. कायद्याचे शिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय अभ्यासले होते. कायद्याची एल्एल.बी. ही परीक्षा पास झाल्यानंतर ते वर्‍हाडमध्येच इ.स. १८८५ ते १८९० या सालांत आधी मुन्सिफ या पदावर, व नंतर उपायुक्त म्हणून सरकारी नोकरी करू लागले. लोकमान्य टिळ्कांशी घनिष्ट संबंध आणि राजकारणात रस असल्याने त्यांनी सरकारी नोकरी सोडून अमरावतीला वकिली सुरू केली. १८९७मध्ये अमरावतीला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. कलकत्यात काँग्रेसने भरवलेल्या शिवाजी उत्सवात ते टिळकांबरोबर हजर होते. टिळकांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी असल्याने, दादासाहेब खापर्डे हे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल या त्रयीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसमधल्या जहाल गटात सामील होते. त्यांच्या कणखर व असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मध्य प्रांतात दरारा असल्याने तेथे ते वर्‍हाडचे नबाब म्हणून ओळखले जात.

दादासाहेब खापर्डे हे, इ.स.१९१६ मध्ये टिळकांनी काढलेल्या इंडियन होम रूल लीगच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. देशाच्या कारभारात सुधारणा सुचविणाच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या व्हॉइसरॉयला भेटायला गेलेल्या कॉग्रेसच्या समितीमध्ये ते होते. मे १९१९ ते जामेवारी १९२० या काळात खापर्डे यांचा मुक्काम इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीत आपली बाजू मांडण्यासाठी इंडियन होम रूल संघाचे प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होता.