"रोहिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रोहिस या नावाचे एक सुगंधी गवत आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती ...
(काही फरक नाही)

१३:०७, ८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

रोहिस या नावाचे एक सुगंधी गवत आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तिला विविध भाषांमध्ये पुढील नावे आहेत

इंग्रजी : जिरानियम ग्रास, रोशा ग्रास, Palma rosa

हिंदी : गंधेजघास, बुजिना, मिरचियागंद

कानडी : वासनचुल्लु

गुजराथी : रोबडो, र्‍हसघास

संस्कृत : भूति(क), भूतीक, भूतविनाशनी, भूतृण, कत्तृण, रोहिष, सौगंधिक, पौर, ध्याम, देवजग्ध(क), रामकर्पूर

लॅटिन : 1. Cymbopogon martinii(Roxb)(Wats)

2. Cymbopogon martinianus (Schult)

3. Cymbopogon pachnodes (Trin Wats)

4. Andropogon martinii (Roxb)

5. Andropogon schoenanthus L. variety matinii (Hook.f)

रोहिस गवत हे एक उंच वाढणारे, बहुवर्षायू व गोड वासाचे गवत आहे. दीड ते अडीच मीटर उंच. खोड पिवळसर,पर्णयुक्त. पाने सपाट्, नेहमी रुंद. तळाशी हृदयाकृती किंवा गोलाकार. आतील पाने आच्छादित. फुलोर्‍याखालील पाने २३ सेंमी लांब आणि १ सेंमी रुंद, बाकीची अडीच सेंमी रुंद. पानाअंच्या कडा खरखरीत. फुले कणिश द्विविभाजित, १२ ते १८ मिमी लांब, तिरपी किंवा द्विचल. फुलांचा मोसम ऑक्टोबर-नोव्हेंबर.

अधिवास : उघडी कुरणे, प्रामुख्याने भारताचा दख्खन भाग

प्रदेश : गुजराथ, सौराष्ट्र, दख्खन, कोंकण, पश्चिम घाट, उर्वरित महाराष्ट्रातील अनेक भाग, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश

प्रसार : भारत, अफगाणिस्तान, उत्तर आफ्रिका

उपयुक्त भाग : पूर्ण झाड

गुणविशेष : तुरट, कडवट

उपयोग : कफज्वर, श्वास नलिकेचा दाह, दुखणे, त्वचारोग, ःरुदयरोग, घशाचा त्रास, आवाज बसणे, लहान मुलांमधील अपस्मार, आकडी यांत उपयोगी.

पानांपासून ऊर्ध्वपातन करून काढलेले सुगंधी रोशा तेल उत्तेजक, वायुनाशी, प्र्त्यंगग्राही, स्वेदकारी, आणि आतड्यातील मुरडा यांवर उपयोगी. संधिवात, केशनाश ञांवरही वापरतात. रोशा तेलाचे प्रमुख उत्पादन मध्य प्रदेशातील बैतूल आणि मिमार येथे आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात होते. रोहिस गवताचे दोन प्रमुख प्रकार आहेत. मोतिया आणि सोफिया. मोतिया प्रकारच्या गवतापासून काढलेलेतेल उच्च गुणवत्तेचे असते; त्याला पामरिझा तेल किंवा ईस्ट इंडियन जिरेनियम तेल म्हणतात.