"अश्वघोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Narayanbot1 (चर्चा | योगदान) छो वर्ग:व्यक्ती हा स्थूल वर्ग काढला using AWB |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
याचा काळ सुमारे इ.स.पूर्व १५०(की इसवी सनाचे पहिले शतक?) असा होता. '''अश्वघोष''' हा एक बौद्ध विद्वान व [[कवी]] होता. जन्माने ब्राह्मणपुत्र, गौरवर्णी, पिंगट केसांचा व रूपवान असा हा अश्वघोष वेदविद्येत पारंगत, संस्कृततज्ज्ञ, संगीतज्ञ, गायक आणि वीणावादकही होता. याच्या वडिलांचे नाव माहीत नाही, पण आईचे सुवर्णाक्षी. तल्लख बुद्धीचा अश्वघोष लहानपणापासूनच कलासाधक होता. |
|||
सिकंदराच्या भारतावरील स्वारीदरम्यान भारतात ग्रीकांचा प्रवेश झाला. त्यांच्याबरोबरच त्यांची नाट्यकला भारतात आली. तेव्हा एका नाट्यमंडळीच्या संपर्कात अश्वघोष आला. तो ग्रीकांची नाटके पाहू लागला. अशाच एका ग्रीक नाटकाच्या प्रयोगाचा अश्वघोषावर प्रचंड परिणाम झाला. त्या नाटकातील प्रभा नावाच्या एका नटीवर अश्वघोषाचे प्रेम बसले. तिने त्याच्या प्रेमाला साथ दिली नाही. ती म्हणाली की "तू असे काहीतरी कर की ज्यामुळे तुझे नाव अमर होईल." या प्रेमभंगाचा घाव जिव्हारी बसला. त्यातूनच अश्वघोषाचे पहिले नाटक 'उर्वशी वियोग' जन्माला आले. |
|||
दुसरे नाटक राष्ट्रपाल. त्यानंतर त्याने बौद्ध भिक्षू होण्याचे ठरवले. तो भिक्षू झाला तरी त्याचे नाट्यप्रेम कमी झाले नाही. त्याने बुद्धशिष्य सारीपुत्र आणि मोग्गलायन यांच्यावर 'सारीपुत्त प्रकरण' नावाचे एक नऊ अंकी संस्कृत नाटक लिहिले. त्या नाटकात चोर, जुगारी, लफंगे, चेट(=गुलाम, दास), विट(राजकुमाराचा विलासी पण धूर्त मित्र), गणिका, वेश्या, दारुबाज आणि विदूषकही आहेत. अशीच पात्रे पुढे आलेल्या शूद्रक विरचित 'मृच्छ्कटिक' नाटकात आहेत. अश्वघोषाचा प्रभाव कालिदासासारख्या पुढच्या नाटकाकरांवरही झाल्याचे दिसते. |
|||
अश्वघोष हा भिक्षू, संगीतज्ञ व गायक असल्याने तो एकतारीवर गाणी गात बौद्धतत्त्वज्ञानाचा प्रचार वस्त्यावस्त्यांमधून हिंडत आणि चौकात उभे राहून करत असे. म्हणजे हा बहुधा पथनाट्याचा जनक असावा. |
|||
अश्वघोषाने 'बुद्धचरितम्' नावाचे हे महाकाव्यही लिहिले आहे. 'सौंदरानंद' हे त्याचे आणखी एक महाकाव्य. त्यातल्या नायिकेचे पात्र गौतमबुद्धाच्या नंद नावाच्या चुलत भावाच्या लावण्यवती पत्नीवर बेतले होते. अश्वघोषाने 'वज्रसूचि' नावाचा एक वैचारिक ग्रंथही लिहिला आहे. अशा या विद्वान कवीची एक जानेवारी ही कल्पित जन्मतारीख समजून त्या दिवशी 'बोधी नाट्य परिषद्' भारतीय कला दिवस साजरा करते. |
|||
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]] |
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]] |
१६:१६, ३ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
याचा काळ सुमारे इ.स.पूर्व १५०(की इसवी सनाचे पहिले शतक?) असा होता. अश्वघोष हा एक बौद्ध विद्वान व कवी होता. जन्माने ब्राह्मणपुत्र, गौरवर्णी, पिंगट केसांचा व रूपवान असा हा अश्वघोष वेदविद्येत पारंगत, संस्कृततज्ज्ञ, संगीतज्ञ, गायक आणि वीणावादकही होता. याच्या वडिलांचे नाव माहीत नाही, पण आईचे सुवर्णाक्षी. तल्लख बुद्धीचा अश्वघोष लहानपणापासूनच कलासाधक होता.
सिकंदराच्या भारतावरील स्वारीदरम्यान भारतात ग्रीकांचा प्रवेश झाला. त्यांच्याबरोबरच त्यांची नाट्यकला भारतात आली. तेव्हा एका नाट्यमंडळीच्या संपर्कात अश्वघोष आला. तो ग्रीकांची नाटके पाहू लागला. अशाच एका ग्रीक नाटकाच्या प्रयोगाचा अश्वघोषावर प्रचंड परिणाम झाला. त्या नाटकातील प्रभा नावाच्या एका नटीवर अश्वघोषाचे प्रेम बसले. तिने त्याच्या प्रेमाला साथ दिली नाही. ती म्हणाली की "तू असे काहीतरी कर की ज्यामुळे तुझे नाव अमर होईल." या प्रेमभंगाचा घाव जिव्हारी बसला. त्यातूनच अश्वघोषाचे पहिले नाटक 'उर्वशी वियोग' जन्माला आले. दुसरे नाटक राष्ट्रपाल. त्यानंतर त्याने बौद्ध भिक्षू होण्याचे ठरवले. तो भिक्षू झाला तरी त्याचे नाट्यप्रेम कमी झाले नाही. त्याने बुद्धशिष्य सारीपुत्र आणि मोग्गलायन यांच्यावर 'सारीपुत्त प्रकरण' नावाचे एक नऊ अंकी संस्कृत नाटक लिहिले. त्या नाटकात चोर, जुगारी, लफंगे, चेट(=गुलाम, दास), विट(राजकुमाराचा विलासी पण धूर्त मित्र), गणिका, वेश्या, दारुबाज आणि विदूषकही आहेत. अशीच पात्रे पुढे आलेल्या शूद्रक विरचित 'मृच्छ्कटिक' नाटकात आहेत. अश्वघोषाचा प्रभाव कालिदासासारख्या पुढच्या नाटकाकरांवरही झाल्याचे दिसते.
अश्वघोष हा भिक्षू, संगीतज्ञ व गायक असल्याने तो एकतारीवर गाणी गात बौद्धतत्त्वज्ञानाचा प्रचार वस्त्यावस्त्यांमधून हिंडत आणि चौकात उभे राहून करत असे. म्हणजे हा बहुधा पथनाट्याचा जनक असावा.
अश्वघोषाने 'बुद्धचरितम्' नावाचे हे महाकाव्यही लिहिले आहे. 'सौंदरानंद' हे त्याचे आणखी एक महाकाव्य. त्यातल्या नायिकेचे पात्र गौतमबुद्धाच्या नंद नावाच्या चुलत भावाच्या लावण्यवती पत्नीवर बेतले होते. अश्वघोषाने 'वज्रसूचि' नावाचा एक वैचारिक ग्रंथही लिहिला आहे. अशा या विद्वान कवीची एक जानेवारी ही कल्पित जन्मतारीख समजून त्या दिवशी 'बोधी नाट्य परिषद्' भारतीय कला दिवस साजरा करते.