"दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: <big>दारा सिंग</big> (जन्म : ; हयात) हे एक भारतीय पहिलवान आहेत. त्यांचे बाल... |
(काही फरक नाही)
|
०१:१०, १५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
दारा सिंग (जन्म : ; हयात) हे एक भारतीय पहिलवान आहेत. त्यांचे बालपण स्मृतसरजवळेएल धर्मू चाक नावाच्या खेड्यात गेले. गावाच्या जवळपास शेकडो एकर वडलोपार्जित शेती होती. शेतात काम करण्यात वयाची सतरा वर्षे निघून गेली. अंगात फरपूर ताकद होती, आणि काम करण्याचा जबरदस्त आवाका. एका दिवसात संपूर्ण एका एकरावरील गव्हाची केवळ खुरप्याने करायचा दाराचा विक्रम अजून अबाधित आहे. त्या काळात त्यांच्या गावातले आणि आजूबाजूचे लोक नशीब अजमायला सिंगापूरला जात. दाराही गेला. तिथे त्याचे काका होते, त्यांच्याकडे राहू लागला. एका लष्करी मद्यालयावर त्याला रात्रीच्या पहारेकर्याची नोकरी मिळाली. रात्री पहारा करायचा आणि दिवसा लोक सांगत त्या गामा पहिलवानाच्या गोष्टी ऐकायच्या, असादिनक्रम. त्याचा गामा पहिलवानाच्या गोष्टींमधला रस आणि त्याची शरीरयष्टी पाहून एकानेत्याला कुस्त्या का करत नाहीस म्हणून विचारले. आता इतक्या मोठ्या वयात कुस्ती शिकायची कशीकाय सुरुवात करणार? पण एक वस्ताद भेटला, म्हणाला वयाच्या पंचविशीपर्यंत हाडे तयार होत असतात, कुस्ती सहज शिकता येईल. वस्तादाने दाराला दाढी आणि मानेपर्यंत रुळणारे केस छाटायला लावले. डोक्यावर शीख म्हणून असलेली पगडीचा त्याग करायला लावला, आणि त्याची तालीम सुरू केली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी दारा कुस्तीच्या आखाड्यात उतरला.
लवकरच दारा सिंग सिंगापूरमधील भारतीय कुस्तीगीरांच्या दोन गटांचा सभासद झाला. त्याच्या पहिल्या जाहीर कुस्तीत दर सिंग यांनी एका चिनी पहिलवानाला चीतपट केले. या कुस्तीने दाराला प्रसिद्धी आणि पैसे मिळाले. आणखी एकदोन कुस्त्या जिंकल्यावर दार सिंग यांनी पहारेकर्याची नोकरी सोडून दिली आणि कुस्तीवर संपूर्ण ध्यान द्यायला सुरुवात केली. सिंगापूरवरून इंडोनेशिया आणि श्री लंका येथे जाऊन तिथल्या पहिलवानांना हरवून दारा सिंग भारतात मुंबईत आले. त्या वेळी मुंबईत युरोपी कुस्तीगीर किंगकाँगचा बोलबाला होता. किंगकाँग आपल्या पाशवी शक्तीसाठी आणि उद्धटपणासाठी कुप्रसिद्ध होता. दारसिंगने मुंबईत असताना त्याच्याशी जबरदस्त कुस्ती खेळून त्याचा पाडाव केला. किंगकाँगला हा अपमान जिव्हारी लागला आणि त्याने तो सिंगापूरला कायमसाठी निघून गेला. त्यानंतर दारा सिंग युरोपात गेले आणि तिथे त्यांनी कुस्तीत एकदाही न हरण्याचा विक्रम केला. शेवटी १९५९ मध्ये कॅनडाला जाऊन तिथे कुस्त्या खेळून दारा सिंग यांनी कॉमनवेल्थसाठी ठेवलेली ट्रॉफी जिंकली आणि ते भारतात परत आले.
चित्रपटसृष्टीत प्रवेश
निवृत्तीनंतरचे आयुष्य
कुस्तीतून आणि चित्रपटांतून निवृत्त झाल्यावर दारा सिंग आपल्या रशिनयन पत्नीसह आणि मुलां-नातवंडांसमवेत जुहूच्या बंगल्यात मजेने राहत आहेत अजूनही ते औरंगाबाद आणि भारतातील इतर शहरांत जाऊन पहिलवानांना मार्गदर्शन करतात्, आणि आपल्या अध्यक्षतेखाली कुस्त्यांचे फड भरवतात. त्यांच्या मुलाचे नाव विंदू आहे. तो अनेकदा दूरचित्रवाणीवर झळकतो.