"नरेंद्र सिंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नरेंद्र सिंदकर (जन्म :२१ नोव्हेंबर १९२८; हयात ) यांनी १९६६ साली त्या... |
(काही फरक नाही)
|
१९:४८, ९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
नरेंद्र सिंदकर (जन्म :२१ नोव्हेंबर १९२८; हयात ) यांनी १९६६ साली त्यांनी आपल्या कुटुंबीयासह मॉस्को विमानतळावर पाऊल ठेवले आणि तेव्हापासून १९९२ सालापर्यंत सलग २५ वर्षे त्यांनी मॉस्को नभोवाणीवरून मराठी विभागप्रमुख या नात्याने मराठी वृत्तप्रसारणाचे काम केले. वृत्तनिवेदन हा त्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने तर केलाच, शिवाय या अनुषंगाने त्यांनी भारताच्या सांस्कृतिक दूताची कामगिरीही यशस्वीपणे पार पाडली. रशियातली कारकीर्द हे त्यांच्या आयुष्यातले सर्वाधिक उज्ज्वल पर्व होते.
नरेंद्र सिंदकर यांचे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत व रशियन या पाचही भाषांवर प्रभुत्व आहे. या सर्व भाषांतील काव्यसंपदेतील पंक्तीच्या पंक्ती त्यांना मुखोद्गत आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या गूढ मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेले शहानवाझ व खोसला आयोग यांनी केलेली चौकशी पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे भारत सरकारने न्या. मनोजकुमार मुखर्जी आयोग नेमला; त्याला मदत करण्यासाठी दि नेताजी प्रोब अॅण्ड रिसर्च फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. या समितीवर राज्यातर्फे सदस्य म्हणून सिंदकरांची नेमणूक झालेली असून, ते आयोगापुढे साक्ष देण्यासाठी गेले होते.
त्यांची ग्रंथसंपदा
- काव्य संग्रह : An Anthology of Indian Poetry (विंदा करंदीकर, पाडगांवकर, बापट, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, इंदिरा संत, शान्ता शेळके, पद्मा गोळे इत्यादिकांच्या कवितांचा त्यांनी केलेला रशियन अनुवाद)
- शोलोकोव् यांच्या And Quiet Flows The Don या नोबेलविजेत्या रशियन कादंबरीचा ‘साहित्य संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केलेला मराठी द्विखंडी अनुवाद. पहिल्या खंडात लेखकाने स्टॅलिनशाहीचा उदय व अंमल यांचे विवेचन केलेले असून त्यांच्या मते स्टॅलिनशाही ही कितीही निर्घृण व निर्मम असली तरी ती काळाची गरज होती. दुसर्या खंडात त्यांनी सोव्हिएत साम्राज्यातील गोर्बाचेव पर्व आणि त्या काळातील ‘पेरेस्त्रोइयाला का’ (पुनर्रचना) व ‘ग्लासनोस्त’ (भाषणस्वातंत्र्य) या नवीन मुक्त विचारप्रवाहांचा परामर्श घेतला असून, त्यानंतरच्या काळात रशियन राजवटीचा क्रमश: कसा र्हास होत गेला, याची कारणमीमांसा केली आहे. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी विविध नकाशांची व आकडेवारीची जोड दिली आहे.
- रामायणातील लक्ष्मण या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडलेल्या सिंदकरांनी लिहिलेली ‘ध्वजदंड’ ही कादंबरी ‘श्रीविद्या प्रकाशन’च्या (कै.) मधुकाका कुलकर्णी यांनी १९८६ साली रशियात येऊन प्रकाशित केली. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे २००५ साली कमलप्रभा प्रकाशनतर्फे कादंबरीची दुसरी आवृत्ती ‘लक्ष्मणायन’ या शीर्षकाखाली आचार्य किशोर व्यास यांच्या हस्ते पुण्यात प्रसिद्ध करण्यात आली.
- क्रेमलिनच्या बुरुजावरून (१ली आवृत्ती १९७४- अभिनव प्रकाशन; २ री आवृत्ती २००९- श्रीविद्या प्रकाशन). या पुस्तकात गंगा आणि व्होल्गा या दोघींच्या तीरांमधून वाहणार्या त्यांच्या जीवनप्रवाहाचे ओघवते वर्णन त्यांनी केले आहे. रशियन जीवनसरणीचे सर्वांग, तेथील प्रशासनव्यवस्था, दैनंदिन राहणी, खाद्यजीवन, कलाजीवन, सण-उत्सव, वैज्ञानिक व अंतराळ संशोधन, राजकारण, आणि तेथील ऋतुरंग या सार्या रसरशीत जीवनानुभवाचे अत्यंत रसाळ वर्णन त्यांनी या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकाला १९७४ साली महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला होता.
- पहिले पाढे पंचावन्न हे विनोदी पुस्तक. याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘चिं. वि. जोशी’ पुरस्कार मिळाला होता.
- त्य़ांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर १२०० पृष्ठांची महाकाय कादंबरीही लिहून ठेवली आहे. ती अजून अप्रकाशित आहे. नरेंद्र सिंदकरांची आणखीही काही पुस्तके या ना त्या कारणास्तव अजून अप्रकाशित राहिली आहेत.