"पाटणादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''पाटणादेवी''' हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव ताल... |
(काही फरक नाही)
|
१५:४८, २५ जुलै २०११ ची आवृत्ती
पाटणादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई-नासिकरोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर लगेच चाळीसगाव हे रेल्वे स्टेशन येते. चाळीसगाव एस्टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बशी सुटतात. चाळीसगाव-पाटणादेवी हे अंतर १८ किलोमीटर आहे. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे.
शके ११५०(इ.स.१२२८)मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते.
पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत. शून्याचा आविष्कार करणार्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. वनखात्याने भास्कराचार्यांच्या स्मरणार्थ मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे. हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळांत पर्यटकांसाठी खुले असते.
पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर, सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे.