"अशोक वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ११: | ओळ ११: | ||
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे. |
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. फुले येण्याच्या बाबतीत हा वृक्ष फार लहरी आहे. फुलण्याचा काळ शरद ऋतूपासून ग्रीष्म ऋतूपर्यंत मागेपुढे होऊ शकतो. म्हणूनच बहुधा सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे. |
||
*संस्कृत: अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम् |
*संस्कृत: अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम्(+ वर दिलेली नावे) |
||
*हिंदी : अशोक, अंपिच |
*हिंदी : अशोक, अंपिच |
||
*बंगाली : अशोक |
*बंगाली : अशोक |
||
*गुजराथी: अशोपालव |
*गुजराथी: अशोपालव |
||
*मल्याळम : अशोका |
*मल्याळम : अशोका, हेमपुष्पम् |
||
*तामिळ: अशोगम् |
*तामिळ: अशोगम् |
||
*उडिया : |
*उडिया : ओशोको |
||
*तेलुगू |
*तेलुगू : अशोकमू |
||
*इंग्रजी : Asoka |
*इंग्रजी : Asoka |
||
*लॅटिन- |
*लॅटिन- |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची झुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात(शेंगेत) ४ ते ८ बिया असतात, पण पिकलेले बी एखादेच असते. बिया रुजायला फार वेळ लागतो अनेक बिया पेराव्यात तेव्हा त्यांतली एखादीच रुजते. त्यांतली चार रोपे ४-५ वर्षे सांभाळली की एखादा वृक्ष तयार होतो. |
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची झुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात(शेंगेत) ४ ते ८ बिया असतात, पण पिकलेले बी एखादेच असते. बिया रुजायला फार वेळ लागतो अनेक बिया पेराव्यात तेव्हा त्यांतली एखादीच रुजते. त्यांतली चार रोपे ४-५ वर्षे सांभाळली की एखादा वृक्ष तयार होतो. |
||
==पानांचा अशोक== |
|||
पानांचा अशोक किंवा हरित अशोक हे फुलांच्या अशोकापेक्षा वेगळे झाड आहे, त्याचे शास्त्रीय नाव आहे Polyalthia longifolia. हिंदी-बंगालीत देवदारु म्हणतात. हे झाड म्हणजे, ज्याच्या लाकडापासून घरगुती लाकडी सामान बनते ते देवदार(Cedrus deodara)नामक झाड नाही! मल्याळीत पानाच्या अशोकाला चोरुणा म्हणतात. |
|||
===उत्पत्तिस्थान=== |
===उत्पत्तिस्थान=== |
१६:२३, २७ जून २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
नावे
अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक. पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोकवगैरे प्रकार आहेत. या फुलाच्या अशोकाला सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, तपनीय अशोक, सुवर्णाशोक वगैरे नावे आहेत. शास्त्रीय नावे आहेत--Saraca asoca, Saraka indica व Jonesia asoca. या वृक्षाचे वर्णन कालिदासाने ऋतुसंहार या काव्यात खालील पंक्तीत केले आहे :
आमूलतो विद्रुमरागताम्रं सपल्लवं पुष्पचयं दधानः -- ऋतुसंहार ६-१७. (अर्थ : आरंभापासून पोवळ्यासारखा तांबडा रंग असणारे फुलांचे झुपके असणारा भरपूर पाने असलेला वृक्ष.
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. फुले येण्याच्या बाबतीत हा वृक्ष फार लहरी आहे. फुलण्याचा काळ शरद ऋतूपासून ग्रीष्म ऋतूपर्यंत मागेपुढे होऊ शकतो. म्हणूनच बहुधा सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे.
- संस्कृत: अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम्(+ वर दिलेली नावे)
- हिंदी : अशोक, अंपिच
- बंगाली : अशोक
- गुजराथी: अशोपालव
- मल्याळम : अशोका, हेमपुष्पम्
- तामिळ: अशोगम्
- उडिया : ओशोको
- तेलुगू : अशोकमू
- इंग्रजी : Asoka
- लॅटिन-
वर्णन
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची झुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात(शेंगेत) ४ ते ८ बिया असतात, पण पिकलेले बी एखादेच असते. बिया रुजायला फार वेळ लागतो अनेक बिया पेराव्यात तेव्हा त्यांतली एखादीच रुजते. त्यांतली चार रोपे ४-५ वर्षे सांभाळली की एखादा वृक्ष तयार होतो.
पानांचा अशोक
पानांचा अशोक किंवा हरित अशोक हे फुलांच्या अशोकापेक्षा वेगळे झाड आहे, त्याचे शास्त्रीय नाव आहे Polyalthia longifolia. हिंदी-बंगालीत देवदारु म्हणतात. हे झाड म्हणजे, ज्याच्या लाकडापासून घरगुती लाकडी सामान बनते ते देवदार(Cedrus deodara)नामक झाड नाही! मल्याळीत पानाच्या अशोकाला चोरुणा म्हणतात.
उत्पत्तिस्थान
अशोकाचे झाड मध्य आणि पूर्वीय हिमालयात, पूर्वीय भारतात आणि दक्षिणी भारतात आढळते. याच्या शोभिवंत फुलांसाठी हे झाड मुद्दाम लावले जाते.
उपयोग
झाडाच्या वाळलेल्या सालीत औषधी गुणधर्म आहेत. साल स्त्रियांच्या मासिक पाळीत होणार्या अतिरक्तस्रावासाठी गुणकारी असते. मूत्रविकारांवर आणि स्त्रियांच्या गर्भाशयाच्या अनेक रोगांवर अशोकाची साल, फुले आणि बिया उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. यांच्यातल्या नेमक्या कोणत्या घटकामुळे हे परिणाम मिळतात हे मात्र अजूनही शोधून काढले गेलेले नाही.