"अर्भकावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बाळ म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळं... |
(काही फरक नाही)
|
००:१६, २२ मार्च २०११ ची आवृत्ती
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बाळ म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. हे छोटे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की त्याचा किंवामुलगी असली की तिचा उल्लेख नावानिशी व्हायला लागतो. आईच्या दृष्टीने मात्र तिचा मुलगा कितेही मोठा झाला तरी कधीकधी बाळच राहतो.
महाराष्ट्रातली काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले. अशा काही माणसांची ही यादी :
- बाळ कर्वे(चित्रपट आणि नाट्य अभिनेते)
- बाळ कुरतडकर(नभोवाणी निवेदक)
- बाळ कोल्हटकर(नाटककार)
- बाळ गंगाधर टिळक (विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी)
- बाळ गाडगीळ (अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक)
- बाळ ठाकरे (संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते)
- बाळ फोंडके ( वैज्ञानिक लेखक)
- बाळ भागवत (आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक)
- बाळशास्त्री जांभेकर (मराठीतले आद्य वृत्तपत्रकार)
- बाळशास्त्री हरदास (विद्वान वक्ते)
याशिवाय
- दत्ता बाळ (कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ)
- प्रकाश बाळ (विचारवंत लेखक)
- विद्या बाळ ( विचारवंत समाजसेवक लेखिका)