Jump to content

"दत्तकवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी कवी दत्त यांचे पूर्ण नाव, दत्तात्रेय कोंडो घाटे. जन्म २७ जून ...
(काही फरक नाही)

२३:२१, ७ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

मराठी कवी दत्त यांचे पूर्ण नाव, दत्तात्रेय कोंडो घाटे. जन्म २७ जून १८७५(अहमदनगर), अपघाती मृत्यू १३ मार्च १८९९(बडोदे). त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायास्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज(मुंबई) आणि ख्रिश्चन कॉलेज(ईंदूर) येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या कविता बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षाणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि. द. घाटे यांनी १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. नवे पान या डॉ. मा. गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.


त्यांच्या गाजलेल्या काही कविता

१. बा नीज गडे नीज गडे लडिवाळा

२. बोलत कां नाहीं झालें काय तुला बाई

३. प्रात:काली कुणी कोकिळा तरु-शिखरीं बैसुनी । उंच स्वराने सांगुं लागली जगतालागोनी;

४. प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला

५. या बाइ या, बघा बघा कशि माझि बसलि बया

६. अमर्याद हा व्योमसिंधू गभीर । मधें चालली घार ही नाव धीर

७. मोत्या शीक रे अ आ ई! सांगुं कितितरी बाई !