Jump to content

"पंडित वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: <u>'''वैजनाथ शिवराम कानफाडे ऊर्फ वैजनाथशर्मा पंडितः-'''</u> (इसवी सन १९ व...
(काही फरक नाही)

२३:३९, ७ फेब्रुवारी २००७ ची आवृत्ती

वैजनाथ शिवराम कानफाडे ऊर्फ वैजनाथशर्मा पंडितः- (इसवी सन १९ व्या शतकाचा प्रारंभकाल) अर्वाचीन मराठी गद्यरचनेचे आद्य प्रवर्तक. वैजनाथशास्त्री हे नागपूरकडचे राहणारे. कलकत्ता येथे नागपूरकरांचे वकील म्हणून वेणीरामपंत नावाचे गृहस्थ होते, त्यांच्या आश्रयाला हे प्रारंभी राहिले. हे संस्कृत, फ़ारसी, हिंदुस्थानी, इंग्रजी व बंगाली ह्या भाषात प्रवीण होते. त्यांचे बहुभाषित्व लक्षात घेऊन डॉ. कॅरेंसारख्या धर्मप्रचारकाने त्यांचा भरपूर उपयोग करून घेतला, आणि मराठीतील आद्य व्याकरण-कोशकार असा लौकिक वैद्यनाथशास्त्रींनी मिळवला.

मराठीतील पहिले मुद्रित ग्रंथ - मराठी भाषेचे व्याकरण व सेंट मॅथ्यू - हे दोन्ही तयार करण्यास डॉ. विल्यम कॅरे या मिशनरी गृहस्थाने वैजनाथशास्त्री या महाराष्ट्रीय पंडिताचे साहाय्य घेतले. १८०५ साली कलकत्त्याजवळील श्रीरामपूर(Serampur) या गावी त्याने ते प्रसिद्ध केले. श्रीरामपूर येथील मिशनच्या शैक्षणिक कार्यातील डॉ. कॅरेंचे वैजनाथशास्त्री हे साहाय्यक होते. बायबलचे मराठीत व हिंदीत भाषांतर करण्यात डॉ. कॅरेंना त्यांचा फारच उपयोग झाला. फ़ोर्ट विल्यम कॉलेजात डॉ. कॅरे हे संस्कृत व बंगाली शिकवत असत. इ. स. १८०३ पासून मराठी शिकवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर पडल्यानंतर त्यांनी वैजनाथशास्त्रींना आपल्याबरोबर मराठी शिकविण्याकरिता म्हणून नेमून घेतले. ह्या दोघांनी मिळून अकरा मराठी पुस्तके प्रसिद्ध केली.

एकोणिसाव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या मराठी गद्य चरित्रात वैजनाथ पंडितांनी लिहिलेले राजा प्रतापादित्याचे चरित्र हे पहिले होय. मात्र हे स्वतंत्र नसून फ़ोर्ट विल्यम कॉलेजातील बंगाली पंडित रामराम बसु ह्यांनी १८०१ साली बंगाली भाषेतील पहिल्या मुद्रित गद्य पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद त्यांनी १८१६ साली केला.

त्यांच्या १० रचना:- १. पंचतंत्र; १८१५. २. बायबल - ५ भाग; १८०७-१८२१. ३. मंगल समाचार(बंगालीवरून अनुवादित); १८११. ४. मराठी-इंग्रजी कोश(मराठी शब्द मोडी लिपीत); १८१०. ५. मराठी भाषेचे व्याकरण; १८०५. ६. रघूजी भोसल्याची वंशावली;१८१६. ७. राजा प्रतापादित्याचे चरित्र; १८१६. ८. सिंहासनबत्तीसी(मृत्युंजय विद्यालंकारलिखित ,बत्रिस सिहासन' १८०२ चे भाषांतर); १८१४. ९. सेंट मॅथ्यू; १८०५. १०. हितोपदेश(मृत्युंजय विद्यालंकारलिखित पुस्तकाचे भाषांतर); १८१५.