Jump to content

"गंगूबाई हनगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२: ओळ २२:
==शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे==
==शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे==
* १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.
* १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.
* १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णम्माचार यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.
* १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.
* १९३१:गोरेगांव, मुंबई येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.
* १९३१:गोरेगांव, मुंबई येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.
* १९३२:हिज मास्टर्स व्हॉइस(एच्‌एम्‌व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.
* १९३२:हिज मास्टर्स व्हॉइस(एच्‌एम्‌व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.
ओळ ३२: ओळ ३२:
* १९८२ ते १९८४: कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा.
* १९८२ ते १९८४: कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा.
* १९९२ ते १९९४: कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या.
* १९९२ ते १९९४: कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या.
* २००२: ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार.
* २००२: ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार. त्यानंतर त्या कुंदगोळ(१५ डिसें.२००५ व १२ मे २००७), बेळगांव(१२-३-२००६, १२-८-२००७ व १२-४-२००८), बंगलोर(१२-८-२००६ व २७-१०-२००७) आणि हुबळी(६-१-२००८) येथे १५ ते ४५ मिनिटे गायल्या.
* २००९ : ५ मार्च रोजी वयाच्या ९६व्या वाढदिवशी त्या आपल्या धारवाडच्या जन्मघरी दहा मिनिटे गायल्या. हे त्यांचे शेवटचे जाहीर गाणे.
* २००६: मार्चमध्ये वयाच्या ९४व्या वर्षी, त्या मैफिलीत शेवटचे गायल्या.
* २००९: २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले.
* २००९: २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले.



१८:५८, २५ मे २०१० ची आवृत्ती

साचा:भारतीय शास्त्रीय गायक गंगूबाई हनगळ(मराठीत गंगूबाई हनगळ) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

जन्म आणि बालपण

गंगूबाई हानगल यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे १९२४ मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)कॉंग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार.

शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे

  • १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.
  • १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.
  • १९३१:गोरेगांव, मुंबई येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.
  • १९३२:हिज मास्टर्स व्हॉइस(एच्‌एम्‌व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.
  • १९३३:आकाशवाणी(ऑल इंडिया रेडियो)च्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या प्रत्यक्ष गाण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रसारित.
  • १९३३:जी.एन.जोशींबरोबर एच्‌एम्‌व्ही ने भारतीय भाषेत प्रथमतःच ध्वनिमुद्रित केलेले द्वंद्वगीत आकाशवाणीवरून गायल्या.
  • १९३५:पंडित रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वांकडे आल्या. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी सवाई गंधर्वांकडे संगीताचे शिक्षण घेतले व किराणा घराण्याची शैली पूर्णपणे आत्मसात केली.
  • १९५२:जयपूरच्या राजवाड्यात पंडित नेहरूंसमोर गायन.
  • १९७६:धारवाड विद्यापीठात मानद संगीत प्राध्यापक म्हणून लागल्या.
  • १९८२ ते १९८४: कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा.
  • १९९२ ते १९९४: कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या.
  • २००२: ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार. त्यानंतर त्या कुंदगोळ(१५ डिसें.२००५ व १२ मे २००७), बेळगांव(१२-३-२००६, १२-८-२००७ व १२-४-२००८), बंगलोर(१२-८-२००६ व २७-१०-२००७) आणि हुबळी(६-१-२००८) येथे १५ ते ४५ मिनिटे गायल्या.
  • २००९ : ५ मार्च रोजी वयाच्या ९६व्या वाढदिवशी त्या आपल्या धारवाडच्या जन्मघरी दहा मिनिटे गायल्या. हे त्यांचे शेवटचे जाहीर गाणे.
  • २००९: २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले.

परदेशांतील कार्यक्रम

१. अमेरिका : वॉशिंग्टन डीसी, शिकागो, सॅन फ़्रॅन्सिस्को, लॉस ऍन्जेलिस, न्यू जर्सी, बोस्टन, फिलाडेल्फिया. २. इंग्लंड : लंडन. ३. कॅनडा : टोरॅन्टो, मॉन्ट्रियल. ४. फ़्रान्स : पॅरिस. ५. हॉलंड : ऍम्स्टरडॅम. ६. पाकिस्तान : लाहोर, पेशावर, कराची. ७. पूर्व जर्मनी : फ़्रॅन्कफ़र्ट, स्टटगार्ट, बर्लिन, सिग्मॅरिग्नेन, लिपझिग. ८. पश्चिम जर्मनी : ऍम्स्टरडॅम, ट्यूबिन्जन, हॉस्पिटलकिर्च. ९.. नेपाळ: काटमांडू. १०. बांगला देश : डाक्का.

पुरस्कार

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.

उपाधी

जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी(पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या :

  • अंबासुता गंगा
  • अमृतगंगा
  • आधुनिक संगीत शबरी
  • कन्‍नड कुलतिलक
  • गानगंगामयी
  • गानगंधर्व गंगागीत विद्याअमृतवर्षिणी
  • गानरत्‍न
  • गानसरस्वती
  • गुरुगंधर्व
  • नादब्रह्मिणी
  • भारतीकांता
  • रागभूषण
  • रागरागेश्वरी
  • संगीतकलारत्‍न
  • संगीतकल्पद्रुम
  • संगीतचिंतामणी
  • संगीतरत्‍न
  • संगीतशिरोमणी
  • संगीतसम्राज्ञी
  • संगीतसरस्वती
  • सप्तगिरी संगीतविद्वानमणी


  • स्वरचिंतामणी
  • स्वरसरस्वती
  • श्रीगंगामुक्तामणी